शौकतभाई शेख । श्रीरामपूर :
सतत पडत असणाऱ्या पवसामुळे राज्यभरातील बळीराजाचे कमबरडे पूर्णपणे मोडले असून हवालदील व हताश झालेल्या शेतकऱ्यांचे मनात आत्महत्या सारखे विचार येऊ नये म्हणून राज्य सरकार ने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळी पूर्वी विनाअट सरसकट नुकसान भरपाई बळीराजाचे पदरात टाकवी अशी मागणी श्रमिक शेतकरी संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष राजेंद्र मुसमाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली आहे.
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री,कृषी मंत्री यांचेसह जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पाठवलेल्या तातडीच्या निवेदनात मुसमाडे यांनी म्हटले आहे की राज्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला आहे.हाती येऊ पाहणारे पिक नेस्तनाबूत झाले आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा असणारा दिवाळी सणाचे तोंडवर हे घडले आहे. दिवाळी सणाचे फराळ, लेकरांचे कपडे,पूजेचे साहित्य असो की वृद्ध आई वडिलांची साडी धोतर असो या सर्व आशा मावळल्या आहेत.
अशा परिस्थितीत हताश झालेलेल्या बळीराजाच्या मनात आत्महत्या सारखा भयान विचार डोकवण्याची शक्यता नाकारता येत नाही.जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजा वर आलेल्या कठीण समयी त्याला मदतीचा हात देणे ही नैतिक जबाबदारी मानुन राज्य सरकारने दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांना विना अट सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी राजेंद मुसमाडे यांनी केली आहे.
या बरोबरच गेले सहा महीने शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअर वेल च्या मोटरी बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मोटारीचे सहा महिन्याचे विज बिल माफ करण्यात यावे,शेतकऱ्यांना मोफत बियाने, खते पुरवण्यात यावीत, सर्व बँकांना कर्ज वसुलीसाठी तगदा न करण्याचे आदेश देण्यात यावेत, डिझेल साठी क्रेडिट कार्ड देण्यात यावे व शेती साठी जोड धंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसायला बळकटी येण्यासाठी दुधाचे दर वाढवून अनुदान देण्याची मागणी मुसमाडे यांनी केली आहे.