shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा!

हर्षवर्धन पाटील यांच्या जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा!
इंदापूर : प्रतिनिधी दि. 24/10/22 
              दीपावलीचा प्रकाश व आनंदाचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा, उमेद, समृद्धी व निरोगी आयुष्य देईल, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 
          दीपावली हा प्रकाशाचा उत्सव ! प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदाचा प्रकाश कायम तेवत राहावा, अशा शुभेच्छा देत हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येकाने आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन संकल्पना व नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा, असे आवाहन केले आहे.
     दीपावलीचा उत्सव आनंदाने व उत्साही वातावरणात साजरी करताना नागरिकांनी  कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच दिपावली सणाच्या माध्यमातून जगामध्ये आदर्श असलेल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला शुभेच्छा व्यक्त करताना केले.
*चौकट
=====
 स्नेहमीलन कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रण!
  -------------------------------------------- परंपरेनुसार हर्षवर्धन पाटील व कुटुंबीय  नागरिकांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. त्यानुसार भाग्यश्री बंगलो, इंदापूर येथे मंगळवारी (दि.25) दुपारी 1 ते 3 या वेळेत तालुक्यातील नागरिकांनी स्नेहमीलन कार्यक्रमास उपस्थित राहून स्नेह वृद्धिंगत करावा, अशी विनंती हर्षवर्धन पाटील, सौ.भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील यांनी केली आहे.
______________________________

close