shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसलं..?

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
मुंबई :- निर्णय क्षमता असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्या मंत्रीमहोदय आपल्या मर्जीनूसार करतात असा बराचसा इतिहास आहे. या बदल्यामुळे अनेकदा वादंग झाल्याचे महाराष्ट्राला मागचा अनुभव आहे.

आता देखील पोलिसांच्या बदल्यांवरुन शिंदे-फडणवीस यांच्या मध्ये मतभेद झाल्याचे समजते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना रविवारपासूनच उधाण आले आहे.

रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नव्हते, तेव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

यावर पत्रकारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारला असता फडणवीसांनी खोचक टोला लगावला आहे. यावरून‌ स्पष्ट होते की त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येते. तरी महाराष्ट्र हितासाठी त्यांनी दोघांनीही सामंजस्य ठेवणे गरजेचे आहे. असे महाराष्ट्रातील मतदारांचे म्हणणे आहे.
close