दुर्लक्षितांची दिवाळी साजरी*
कालठन केंद्र व गलांडवाडी केंद्रातील शिक्षक बांधवांनी एकत्र येत साखर कारखाना व इतर ठिकाणी उतरलेल्या ऊसतोड बंधू भगिनी यांना दिवाळी निमित्ताने फराळ केले वाटप .
इंदापूर प्रतिनिधी: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कालठन केंद्र व गलांडवाडी केंद्रातील शिक्षक बांधवांनी एकत्र येत स्वतः तसेच इतर शिक्षक वृंद व मित्रमंडळी यांचे सहकार्यातून साखर कारखाना व इतर ठिकाणी उतरलेल्या ऊसतोड बंधू भगिनी यांना दिवाळी निमित्ताने फराळ वाटप केले. साधारण १४०००रुपये किमतीचे फराळ १५० पेक्षा जास्त ऊसतोड कुटुंबाना वाटप करण्यात आले .
यावेळी राजवडी , काळेलवाडी ,, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हमाल चाळ, व ऊसतोड कामगारांची पाले व प्रत्यक्ष बांधावर जाऊन गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कामगार बंधू भगिनी व लहान मुले यांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला ... दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे ,समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे यासारखे पुण्य ते काय ? मित्रवर्य जमीर शेख सर यांच्या कल्पनेतून आलेली ही गोष्ट साकार करण्यासाठी श्री वसंतराव फलफले सर ,श्री भालचंद्र भोसले ,श्री सुधाकर गडशिंग, श्री अमोल बोराटे ,श्री प्रवीण ढुके, श्री तुकाराम बुटे श्री नितिन भोसले व श्री रवींद्रकुमार तनपुरे,मेनूद्दीन मोमीन, प्रविण ढुके या शिक्षक बांधवांचे मोलाचे सहकार्य यास लाभले .