अश्वि बु.प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील अश्वि बु. येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 11 जागांसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या दोन गटात दुरंगी लढत होणार असून ११ जागांसाठी ३२ जण रिंगणात उतरले असले तरी सोमवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.
निवडणुकीत दोन गट चुरशीने लढणार असले तरी खरी कसोटी कट्टर विखे पाटील समर्थक, वंजारी समाजाचे नेते व ओबीसींचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले निवडणूक प्रचारात उतरल्यावर लागणार आहे.ते कोणत्या गटाचा प्रचार करतात हे तरी अजून जाहीर झालेलं नाही.परंतु ते ज्या गटाचा प्रचार करतील त्याच्या विरोधी गटाची डोकेदुखी नक्कीच वाढणार असल्याचे बोलले जाते.त्यांच्याकडे प्रेरणादायी वक्ता,उत्तम समाज संपर्कप्रमुख, प्रचंड आत्मविश्वासू ,बँकिंग व्यवहाराची उत्तम जाण असलेला चेहरा,निर्भीड व कणखर नेतृत्व म्हणून पाहिले जाते .लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी आपल्याच गटाबरोबर काम करावे यासाठी दोन्ही गटांकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या पत्नी संगमनेर तालुका भाजपा महिला ( ओबीसी ) आघाडीच्या अध्यक्षा सिताताई उगलमुगले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,अजून तरी अश्विनी पतसंस्थेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.वेळेला निर्णय घेऊ.