खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील क्रीडा संकुलाला दिली भेट.
इंदापूर प्रतिनिधी: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील नियोजित दौऱ्यात असताना त्यांनी इंदापूर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन त्या ठिकाणच्या उपलब्ध सोयी सुविधा आणि अडचणींची माहिती घेतली.
यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे,पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले ,सचिन सपकळ, युवा नेते दीपक जाधव, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सागर मिसाळ, हामा पाटील, श्रीधर बाब्रस, दत्तात्रय व्यवहारे, शरद झोळ, सुनिल मोहिते, सागर व्यवहारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजश्री व्यवहारे, सागर नरळे यांसह खेळाडू उपस्थित होते.यावेळी सुळे यांनी या क्रीडा संकुलावर उपस्थित असणाऱ्या खेळाडूंशी संवाद देखील साधला आहे
क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी क्रिडा संकुलात असणाऱ्या सर्व सोयी सुविधांची सुळे यांना माहिती दिली. यासोबतच भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांचा आढावा ही त्यांनी त्यांच्यासमोर मांडला. इंदापूर शहरातील नागरिक आणि खेळाडूंकरिता या संकुलामध्ये सुसज्ज असा जलतरण तलाव निर्माण करणे आवश्यक असल्याचं चावले यांनी सांगताच सुळे यांनी याबाबातचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच सीएसआर फंडामधून व इतर काही फंडामधून या क्रिडा संकुलामध्ये प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी काही सुविधा देता येतील का या संदर्भात ही यावेळी चर्चा झाली. शेवटी इंदापूर क्रिडा संकुलात निर्माण करण्यात आलेल्या सर्व सुविधांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केले.