शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
सामाजिक बातमी..
शिर्डी साई सेवानिवासी मतिमंद मुला- मुलींची शाळा, शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी सदर बनवलेल्या वस्तूंना रंगकाम व पॅकिंग करून आणि अगरबत्ती पॅकिंग करून विद्यार्थ्यांच्या हस्ते परिसरात विक्री करण्यात आली.
त्या लहान चिमुकल्यांना त्या वस्तू खरेदी करून ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तरी ग्रामस्थांनी मतिमंद मुलांकडून त्यांनी बनवलेल्या अगरबत्ती आणि इतर वस्तू स्वस्त दरात असल्यामुळे त्या वस्तू खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा.असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.