शारदानगर बारामती येथे आनंदी पुष्प महिला गृह उद्योग ह्यांच्या थालीपीठ व चकली ह्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग.
सणसरच्या सौ. पुष्पाताई भालचंद्र निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्कर्षाची वाटचाल करण्यासाठीकेले मार्गदर्शन .
इंदापूर प्रतिनिधी: सौ नंदाताई राजेंद्र पवार ह्यांच्या प्रेरणेने व मजबूत पाठबळावर, सणसर (ता. इंदापूर) येथील आनंदी पुष्प महिला गृह उद्योग ह्यांच्या थालीपीठ व चकली ह्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बारामती कृषी विद्यालय, शारदानगर बारामती येथे शरद पवार ,सुप्रियाताई सुळे,अजित पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आनंदी पुष्प महिला गृह उद्योगाच्या संचालिका सौ पुष्पाताई भालचंद्र निंबाळकर ह्यांनी उपस्थित ग्रामीण भागातील हजारो महिला भगिनींना अत्यंत प्रेरणादायी अश्या पद्धतीने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्कर्षाची वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले.निंबाळकर दांपत्याने दर शनिवारी पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड येथे थेट शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजारात थालीपीठ चकली इतर ही घरगुती पदार्थ विक्री करून शहरी भागातील ग्राहक जोडले,दर्जेदार उत्पादनां मुळे कोरोना च्या निर्बंध काळात ही त्यामुळे आनंदी पुष्पच्या उत्पादनांना चांगली मागणी होती,ह्या च ग्राहकांनी आणखी ग्राहक जोडून दिले व खासदार शरद पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदी पुष्प हा ब्रँड च्या माध्यमातून थालीपीठ व चकली चे उत्पादन नवीन पॅकिंग मध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आले.
सौ पुष्पाताई निंबाळकर ह्यांचे सर्वांनी मनापासून कौतुक केले कारण अतिशय कष्टातून व सामान्य गोरगरीब महिलांना सोबत घेऊन एक गृह उद्योग उभा केला आहे,त्यांचे कार्य हे इतर महिलांना प्रेरणादायी आहे.संपूर्ण देशात ह्या उत्पादनाची विक्री करण्याचे नियोजन सौ नंदाताई राजेंद्र पवार ह्यांनी केले आहे