shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • निंदकाचे घर असावे शेजारी..!भाग ०२..
  •              🌍
  • अगस्ती आश्रमात महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह
  •              🌍
  • शिवरामपुरी मठ संस्थान कायमच आमचे ऊर्जास्त्रोत - आ. नमिता मुंदडा
  •              🌍
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोइंजे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न
  •              🌍
  • शहाजीराजांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद - ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांची खंत.
  • -->

    About Me

    इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत काँग्रेसची साथ सोडून करणार भाजपमध्ये प्रवेश.

    इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत  काँग्रेसची साथ सोडून करणार भाजपमध्ये प्रवेश.
      इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत हे  दिनांक २६ रोजी२०२२ दुपारी २ वाजता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  इंदापूर शहराचा विकास कामासाठी त्यांनी हा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्णय जाहीर केला.                      
     यावेळी सावंत म्हणाले की, विकासकामां संदर्भात तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे दुजाभाव करत होते. अनेक वेळा महाविकास आघाडीतील एक घटक म्हणून स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी याबाबत वारंवार चर्चा करून पाठपुरावा केला मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी येथील रस्त्याच्या कामाचा निधी इतर ठिकाणी वळवला गेला.

    आज याबाबत सोसायटीची सभा झाली. सोसायटीतील सभासदांनी ही बाब माजी मंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर हर्षवर्धन पाटील यांनी तत्काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत कळविले असता त्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून सदर कामांना निधी दिला जाईल असे आश्वासित केले. त्यामुळे इथून पुढील काळात हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्वप्निल सावंत यांनी सांगितले.

    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष  सोडल्यानंतर स्वप्नील सावंत यांनी इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व इंदापूर शहर व तालुक्यात ठेवले होते, परंतु आज त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात  भारतीय जनता पक्षात प्रवेश करून काम करण्याचे ठरवले आहे.

     यावेळी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,  निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद, प्रदीप बोडके  उपस्थित होते.
    close