नगर । प्रतिनिधी
आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ.प्रदीप एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामार्फत मोफत प्रशिक्षण व रोजगाराची संधी मिळत असल्याने विध्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.भविष्यात अशाच नामांकित कंपनीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणे हाच संस्थेचे अध्यक्ष मा. अनिरुद्ध आडसूळ व उपाध्यक्ष मा.विश्वनाथ आडसूळ यांचा मानस आहे आणि त्यासाठीच प्लेसमेंट अधिकारी प्रा. रमेश काकडे हे विविध कंपनीशी संलग्नित राहून विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करीत असतात.
आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये झालेल्या एअरटेल कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या २६ विद्यार्थ्यांसाठी दि. २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान एअरटेल कंपनीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे प्रशिक्षण आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये एक महिना चालले मा .सुजित सिंग यांनी एअरटेल कंपनीतर्फे विविध स्किल विषयावरती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले एअरटेल ह्या कंपनीने २६ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करून तीन लाखाचे वार्षिक पॅकेज दिले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ.किशोर जाधव, एमबीए विभाग प्रमुख डॉ.सुहास पाखरे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट विभाग प्रमुख डॉ. दिनेश अडोकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. हेमंत जाधव,डॉ.कांबळे विश्वजित व डॉ.जैन डी.पी. तसेच यांनी विशेष परिश्रम केले.