shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिर्डीतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ७०० कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० हजारांची मदत - विजय जगताप

शिर्डी प्रतिनिधी  (संजय महाजन) :-

शिर्डी शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त ७०० कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० हजारांची मदत खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मदत रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी दिली. 

जगताप म्हणाले, शिर्डीत यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जाऊन अनेकांचे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या नागरिकांना या अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. दिवाळीच्या तोंडावर येथील नागरिकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे नागरिकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. 

पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याकरिता खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिली असून सदरची दिलेली मदत रक्कम पूरग्रस्त बांधवांच्या बँक खात्यावर जमाही करण्यात आली. असल्याचे जगताप यांनी सांगितले. शिर्डी शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरी खा. लोखंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, विजय काळे, माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
close