शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे वार मंगळवार दि.१८/१०/२०२२ रोजी पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पालक प्रतिनिधी अविनाश पवार यांनी स्वीकारले सर्व पालकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांनी स्वागत केले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गातील शैक्षणिक प्रगती विषयी व विद्यार्थ्यांच्या वर्तन समस्येवर चर्चा केली. तसेच १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी दीपावली सणानिमित्त बनवलेल्या पणत्यांचा स्टॉल लावून पालकांनी खरेदीचा आनंद घेतला.विद्यार्थ्यांना पणत्या शिकवण्याच्या कौशल्यात श्री हनुमंते सर ,श्री वाकचौरे सर ,श्री कोकणे सर व श्रीमती नंदा शेळके मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थ्याचे पालक श्री शरद जाधव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी व आपल्याला सांभाळण्यात येणाऱ्या अडचणी विषयी चर्चा करून मनोगत व्यक्त केले तसेच आपला मुलगा शाळेत घातल्यापासून आतापर्यंत काय सुधारणा झाली याबद्दल पालकांना सांगितले. सर्व शिक्षकांनी पालकांना गुलाब पुष्प देऊन पालकांचे आभार मानले.