शौकतभाई शेख श्रीरामपूर:
महाराष्ट्र शासनाच्या आनंदाच्या शिधा या दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाकडून चार वस्तू वाटपाचा येथील रेव्हेन्यू सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा नेते प्रकाश (आण्णा) चित्ते, सेनेचे राजेंद्र देवकर, मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे,सुधीर वायखेंडे संदीप वाघमारे कैलास भंगे,नंदकिशोर आरोटे,सौ.चित्ते वहिनी, रज्जाकखान पठाण, राजेंद्र त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.