शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-सामाजिक बातमी
श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटना शिर्डी यांचे वतीने कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्ताने भेटवस्तूचे वाटप आज करण्यात आले हा कार्यक्रम शिर्डीचे नगराध्यक्ष मा शिवाजी(भाऊ)गोंदकर यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, प्रतापराव कोते,लक्ष्मणराव सुर्यवंशी सर सचिन क्षीरसागर,प्रल्हाद मुंगसे,हिरे सर,विनोद कांदळकर, बापु गायके,वाल्मिक धरम,सुभाष खडांगळे,विलास जेजुरकर,उमाकांत तुपे,प्रमोद बकरेआदीसह,संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिवाळीच्या निमित्ताने सभासदांना शुभेच्छा देऊन संघटनेच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा दिल्या.