शौकतभाई शेख श्रीरामपूर:
तालुक्याचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी गेली पस्तीस वर्षात अडचणीत व बंद पडण्याच्या स्थितीत असलेला साखर कारखाना उर्जितावस्थेत आणला. कामगारांना कायम व हंगामी कायम करुन न्याय दिला.तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बारा टक्के असा चांगला बोनस दिला याबद्दल साखर कामगार सभा अशोकनगर शाखेच्या प्रतिनिधींनी कारखान्याचे मुख्य सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा सत्कार करुन संचालक मंडळास धन्यवाद दिले.
या कामगार प्रतिनिधींनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की,श्री.मुरकुटे यांनी सन १९८७ मध्ये कारखान्याची सूञे स्विकारली तेव्हा कार्यक्षेञात केवळ ३५ हजार टन ऊस उपलब्ध होता.कारखाना आर्थिक डबघाईस येवून बंद पडण्याच्या मार्गावर असताना अशाही स्थितीत श्री.मुरकुटे व संचालक मंडळाने जिद्दीने कठीण संकटावर मात करीत कारखाना उर्जितावस्थेत आणला.
आज अशोक कारखाना जिल्ह्यातील नामांकित कारखाना म्हणून ओळखला जातो. श्री.मुरकुटे यांनी कारखाना अद्ययावत केला असून कारखान्याची गाळप क्षमाता प्रतिदिन पाच हजार टनापर्यन्त नेली आहे.कारखान्याचे माॕडर्नायजेशन करतानाच १५ मेगावॕट क्षमतेच्या वीज प्रकल्पासह अल्कोहोल तसेच इथेनाॕल प्रकल्पाची नव्याने भर घातली.तसेच या दोन्हीही प्रकल्पाच्या क्षमतेत प्रतिदिन चाळीस हजार क्षमतेत वाढ करुन आगामी हंगामात प्रतिदिन एक लाख लिटर्स अल्कोहोल व इथेनाॕल निर्मिती होणार आहे. वीज प्रकल्प,इथेनाॕल व अल्कोहोल प्रकल्पामुळे तसेच संलग्न संस्थाच्या माध्यमातून उभे राहिलाल्या शैक्षणिक संकुलामुळे स्थानिक रोजगार वाढला. तसेच कारखान्याचे महसुली उत्पन्नही वाढले. यामुळेच एकेकाळी डबघाईस आलेला अशोक कारखाना आज प्रगतीपथावर आहे.याचे श्रेय श्री.मुरकुटे व त्यांचे काळातील आजवरच्या संचालक मंडळास जाते.
आजुबाजूचे कारखाने बंद पडल्याने शेतकरी व कामगारांचे प्रपंच मोडले.पण अशोक कारखाना अडचणीवर मात करुन उर्जीतावस्थेत आणल्याने सभासद व कामगारांचे प्रपंच सावरले.अनेक कामगारांना कायम व हंगामी कायम करुन श्री.मुरकुटे यांनी कामगारांना न्याय दिला.अडचणी आसल्या तरी कामगारांचे नियमित वेतन त्यांना नियमाप्रमाणे वेतनवाढ देवून न्याय दिला.शिस्त व काटकसरीचे धोरण राबविल्यानेच कारखाना सुस्थितीत राहिला. व्यवस्थापनाला राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे (काका) यांचेही मोलाचे सहकार्य राहिले.श्री.मुरकुटे व श्री.
आपटे (काका) यांचेतील सुसंवाद व समन्वयामुळे व्यवस्थापन व कामगार यांचेत सलोखा राहिला. याबद्दल साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष हरिभाऊ गायके, खजिनदार रवी तांबे,सदस्य भिकचंद मुठे,शरद देवकर, शंकर चव्हाण,गोरख चिडे यांनी श्री. मुरकुटे यांचा कामगारांच्या वतीने सत्कार केला.