कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
शौकतभाई शेख श्रीरामपूर:
येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीरामपूर जिल्हा न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश १ व अति.सत्र न्यायाधीश अभिजित नांदगावकर साहेब अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीरामपूर येथील सहायक दिवाणी न्यायाधीश श्री.कांबळे साहेब,कनिष्ठ सहायक दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश श्री.खराडे साहेब, श्रीमती पटेल मॅडम उपस्थित होत्या. सदरच्या शिबिरामध्ये मेंटल हेल्थ ॲक्ट वरती ॲड. पी.आर.धुमाळ मॅडम यांनी ज्येष्ठांना तसेच वृद्धाश्रमामधील सर्व ज्येष्ठ मंडळींना मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती पी. ए. पटेल मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मा. न्यायाधीश खराडे साहेब यांनी ज्येष्ठांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले तसेच मा. श्री. नांदगावकर साहेब यांनी वरील सर्व विषयावर सखोल माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिली.
तसेच शिबिराला ॲड. गणेश सिनारे,ॲड. जीवन पांडे,सुदाम औताडे सर, राजेंद्र देशपांडे, गौरव रासने, बारहाते सर, किरण ताम्हाणे, प्रा.ओमप्रकाश बनकर, सौ. कांचन बनकर, सुरेश गड्डे गुरुजी, किशोर अग्रवाल, अप्पा गवळी, श्री.दळे सर, सौ. कल्पना वाघुंडे, सौ. छाया गिरमे, शुभम नामेकर व न्यायालयीन कर्मचारी श्री. बळे, श्री. दायमा, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावातर्फे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांनी मनोगत व्यक्त करून आनंद मेळावा पुस्तिका भेट दिल्या. माऊली वृद्धाश्रमातर्फे सुभाष वाघुंडे आणि सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी पाहुण्यांचे सत्कार केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांना दिवाळी भेट म्हणून पुस्तके दिली,मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे यांनी पुस्तके देऊन पाहुण्यांचा सत्कार केले. न्यायधीश नांदगावकर यांनी आदर्श सेवाभावी कार्याबद्दल सुभाष वाघुंडे यांचा सत्कार केला. दिवाळी फराळ देऊन वृद्धांचा आनंद द्विगुणित केला. बाजीराव मोटे यांनी योगा प्रयोग करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विजय बोर्डे यांनी केले. तसेच वृद्धाश्रमाविषयी माहिती व कार्यक्रमाचे प्रास्तविक माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी केले. शेवटीॲड.एस. बी. काळे यांनी आभार मानले.