shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सावधान, नगरपालिका निवडणुक येत आहे**नगरसेवकांच्या स्वागतासाठी सज्ज रहा

सावधान, नगरपालिका निवडणुक येत आहे
नगरसेवकांच्या स्वागतासाठी सज्ज रहा

पुढे नगर पालिका निवडणुक येत आहे,आपल्या प्रभागातील खरोखरच कार्यकुशल नगरसेवक असलेल्या आणि नेहमी जनसंपर्कात राहुन जनतेची कुशलतेने कामे करणाऱ्या नगरसेवकांनी पुढील पाच वर्षांसाठी आपल्याकडे सेवेची पुन्हा संधी मागीतल्यास त्यांचे फुल, हार,शाल,श्रीफळ देत यथोचित सन्मान सत्कार करा, तथा त्यांनाच आपली मते द्या.

मात्र एकदा निवडून आल्यानंतर आपल्या कर्तव्याशी बांधील न राहता,ज्यांच्या मतदानाच्या दान - पुनावर (भिक्षेवर) आपल्या नगरसेवकपदाची शेखी मिरवत, केवळ फोटोपुरत्या प्रसिद्धस हापापलेल्या महामुर्ख ज्यांनी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात आपले काळे तोंड न दाखवणाऱ्या निष्क्रिय आणि भंपक,बावळट, लबाड,बातामारे,बिनकामाचे  
नगरसेवकांच्या स्वागतासाठी चप्पला,बुटाडे,अशा प्रकारचे पायतने घालुन सज्ज रहा कारण ..




पावसाचे दिवस असल्याने, चिखलात पाय भरायला नको म्हणून खबरदारी घ्या...
close