shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री गुलाबराव इंगळे पेठ इंदापूर येथे भव्य व्ही.एस.स्मार्ट चे उद्घाटन संपन्न

श्री गुलाबराव इंगळे पेठ इंदापूर येथे भव्य व्ही.एस.स्मार्ट चे उद्घाटन संपन्न   .

उद्घाटन होताच  ग्राहकांची  खरेदीसाठी झुंबड.

      उद्घाटनाप्रसंगी अनेक मान्यवरांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा.
                       
  इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर येथे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे तसेच व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले श्री गुलाबराव इंगळे पेठ शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये ग्राहकांच्या गरजांचा विचार करीत या शॉपिंग कॉम्प्लेक्स चे सर्वेसर्वा उद्योजक राजाभाऊ इंगळे, डॉ. मनोज काळे यांनी इंदापूरकरांच्या व तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी विश्वकर्मा सुपर मार्ट प्रायव्हेट लिमिटेड व मोरया उद्योग समूह त्यांच्या होलसेल किराणा व गारमेंट मॉलचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता इंगळे व काळे कुटुंबीयांच्या चिमुकल्या मुलींच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या उद्घाटनासाठी इंदापूर तालुका ,शहर व तालुक्यातील इतर परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून इंगळे व काळे कुटुंबीयांना शुभारंभ प्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
व्ही. एस. मार्टचे जीवन शिर्के व सचिन पंडित यांच्या हस्ते कपडे खरेदी ची सुरुवात करण्यात आली.

इंदापूर शहरातील हे मार्ट सर्वात मोठे असून संपूर्ण अत्याधुनिक सुविधा युक्त असे हे सुपर मार्ट आहे. लवकरच या सुपरमार्ट च्या माध्यमातून इंदापूर व इंदापूर तालुका परिसरात घरपोच ऑनलाईन पद्धतीने सेवा पुरवण्यात येणार असल्याचे प्रस्तावित आहे.या शुभारंभ प्रसंगी पहिली खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा हार घालून सत्कार करण्यात आला.
close