मराठा क्रांती मोर्चा तील अग्रणी चेहरा आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी आज त्यांच्या असंख्य समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
श्री संजीव भोर हे त्यांच्या अभ्यासू व आक्रमक भाषण शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. मागील वीस वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत सातत्याने सक्रिय राहिलेले आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसह पाणी प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, शेत जमीन कुळांचे प्रश्न अशा समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी संजीव भोर पाटील यांनी आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अमानुष कृत्य जगासमोर आणण्यासाठी पहिले प्रभावी आंदोलन भोर यांनी केले होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून बाळासाहेबांची शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खासदार भावना गवळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, शिवप्रहार संघटनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.