shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पुणे मनपाचे सुरक्षा अधिकारी राकेशजी विटकर यांनी श्री.साई बाबा व श्री शनी महाराज यांचे मनोभावे घेतले दर्शन..!

अहमदनगर । प्रतिनिधी दि. 23
आज धकाधकीच्या जीवनात माणसाला वेळच नसते, अशा वेळी वेळात वेळ काढून जो परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो.. त्यांच्या मागे परमेश्वराची कृपा असते. अशी मान्यता आहे.



आज पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेशजी विटकर यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या सुरक्षा परिवारातील मित्रमंडळी सोबत पूण्यावरून येऊन‌ शिर्डी येथे श्री.साईबाबांचे  व शनी शिंगणापूर येथे श्री शनी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. शिर्डी येथे श्री साईंचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तर शनी शिंगणापूर येथे शनीमहाराजांचे दर्शन, महाआरतीचा लाभ  तसेच आपल्या सर्व मित्रपरिवार सोबत अभिषेक करण्याचे सुवर्णयोग लाभले.

यामुळे त्यांचे सोबत आलेल्या भाविक मित्रांचे आनंद गगनात मावेनासा झाला होता...
 

शनी शिंगणापूर येथे माजी उपसरपंच संदिप अशोकराव कुसळकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आले


शनी शिंगणापूर येथे सोनईचे माजी उपसरपंच संदिप अशोकराव कुसळकर यांनी व शनी शिंगणापूर संस्थानच्या वतीने सुरक्षा अधिकारी राकेश विटकर , पुणे महानगरपालिका मुन्सिपल अर्बन बॅंक संचालक बाळासाहेब उंदरे, नितीन जगताप,, राजाभाऊ ढमालेमाऊली गुळूंजकर, अविनाश कवडे आदींंचे शाल, श्रीफळ देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आले.

close