पुणे-नाशिक हायवे खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा अशी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेची मागणी
मुंबई (महाराष्ट्र):- पुणे-नाशिक हायवेवर आळेफाटा, बोटा, घारगाव याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून दररोज अपघातामध्ये प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागत आहे, वेळोवेळी होणाऱ्या अपघातांमध्ये असंख्य निष्पाप बळी आत्तापर्यंत गेलेले आहेत, जोपर्यंत सदर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पुणे-नाशिक हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचेवर दाखल होत नाहीत तोवर दखल घेतली जाईलच कि नाही? असा संतप्त सवाल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.यावर झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन नेमके किती मृत्यू झाल्यानंतर जागे होणार असा प्रश्न सामान्य प्रवासी तसेच वाहन चालकांना पडलेला आहे.
सदर अपघात टाळण्यासाठी ताबडतोब पण दीर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती व्हावी तसेच अपघातांचे प्रमाण वाढलेल्या खड्डेमय पुणे-नाशिक हायवेचे खड्डे दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अन्यथा असंख्य प्रवासी, वाहनचालक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक हायवेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी दिले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती
मा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,
मा.ना.नितीनजी गडकरी साहेब,
(रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार), मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार)
(मंत्री-सार्वजनिक बांधकाम, वाहतूक)
मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील साहेब,
(पालकमंत्री,अहमदनगर जिल्हा)
(मंत्री, महसुल,पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र सरकार)
पाठविण्यात आल्या आहेत.