*इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेत सहकार नियमानुसार व संस्थेच्या पोटनियमास अनुसरूनच कर्जवाटप होणार - आदीनाथ धायगुडे सभापती इंदापुर तालुका शिक्षक पतसंस्था.
इंदापूर प्रतिनिधी:दि.२२-१०-२२ इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेत सहकार नियमानुसार व संस्थेच्या पोटनियमास अनुसरूनच सर्व कारभार होत आहे.
पतसंस्थेत सर्व सभासद बांधवांना नियमाप्रमाणे नियमित कर्ज वाटप सुरू आहे. याबाबत तमाम सभासद खूश असताना केवळ पोकळ निवेदन देऊन विरोधक श्रेयवादाचे तथ्यहीन राजकारण करीत आहेत. अशा कृतीमुळे संस्थेची व सभासदांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे.सभासदांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन *सभापती अदिनाथ धायगुडे यांनी केले.*
इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेत स्वाभिमानी शिक्षक परिवाराची 21- 0 अशी सत्ता असताना सत्ताधारी अथवा विरोधक असा कोणताही भेदभाव संस्थेमध्ये सर्वच संचालक मंडळ करीत नाहीत. या चांगल्या कामात विनाकारण अनेक मार्गाने अडथळे आणण्याचे काम पराभूत विरोधक मंडळी करीत आहेत. शिक्षक समिती या संघटनेने दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सभासदांनी यावरती विश्वास ठेवू नये स्वाभिमानी शिक्षक परिवारातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत.निर्णय घेताना सर्व बाजूंनी चर्चा करूनच सभासद हिताचे निर्णय घेतले जातात.त्यामुळे सभासदांनी विरोधकांच्या बेगडी प्रेमाला बळी पडू नये असे आवाहन स्वाभिमानी शिक्षक परिवार अध्यक्षीय मंडळाचे *नासाहेब नरुटे,सुहास मोरे,सहदेव शिंदे,सतिश शिंदे,अनिल रूपनवर* यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीत कार्यरत संचालक मंडळ अतिशय पारदर्शक व नियमाप्रमाणे कामकाज करीत आहेत. पूर्वीच्या संचालक मंडळाने वाटप केलेले कर्ज साधारण १.५ कोटी रुपये थकीत आहेत. अशा गोष्टीपासून संस्था वाचली पाहिजे यासाठी सहकार नियमास अनुसरून व पूर्वीचे सर्व पोटनियम समोर ठेवून सभासदांना 30 लाखापर्यंतचे कर्ज वाटप केले जात आहे.
मागील सत्ताधारी यांनी दुय्यम निबंधक साहेबांकडे लेखी मांडलेल्या निवेदनानुसार व ऑडिट रिपोर्ट नुसार कर्जदार सभासद व जामीनदार यांची संस्थेकडे संपूर्ण माहिती केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी सभासदांचा कर्जरोखा पूर्ण असावा. कर्जरोख्यावरती फोटो आवश्यक आहे. संस्थेच्या हितासाठी सहकार नियमानुसार कर्ज वसुलीसाठी वचन चिठ्ठी व कोरे चेक महत्त्वाचे दस्तावेज आहेत. हे सर्व कर्जदारांची कागदपत्रे घेतलीच जाणार याबाबत संचालक मंडळाने संस्था हितास्तव निर्णय घेतला आहे.
कोणताही सभासद एकाच पगारदार संस्थेचा कर्जदार असावा एकाच पगार दाखल्यावर दोन्ही संस्था कर्ज देतात. त्यामुळे सभासदांच्या हातात शासन नियमानुसार ३३% पगार येत नाही. त्यामुळे प्रशासकीय अडचणी वाढतात.यासाठी नियमाप्रमाणे इतर संस्थेचा बाकी नसलेला दाखला घेण्यात येत आहे. पूर्वीच्या पोटनिमानुसारच मुख्याध्यापक पगार दाखल्यास अनुसरून कर्जवाटप आज घडीला सुरू आहे.पगार दाखल्यावरती बसेल एवढेच कर्ज वाटप केले जाईल.नियमबाह्य कर्जवाटप केले जाणार नाही जामीनदार हा सदर कर्जाचा सहकर्जदार असतो. त्यामुळे जामीनदाराची माहिती ही आवश्यक आहे. पूर्वीचे पोट नियम केल्यानुसार चार वर्षे सेवा राहिलेल्या सभासदांना कर्ज वाटप केले जाणार नाही असे असताना विरोधक संस्थेच्या अडचणी वाढवण्यासाठी सरसकट कर्ज वाटण्याची मागणी करीत आहेत. त्यातही मध्यमार्ग काढून बाकी सेवा राहिलेले सभासद यांना त्यावरती बसेल एवढेच कर्ज वाटप सुरू आहे.
संस्था सुस्थितीत आल्यावर संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार कर्जाचा व्याजदर कमी केला जाईल. संचालक मंडळ विश्वस्त म्हणून काम पाहत आहे. संस्थेच्या हितास्तव सभासदांसाठी घेतलेले सर्व निर्णय योग्यच असल्याचे मत सभापती *आदिनाथ धायगुडे,* उपसभापती *रामचंद्र शिंदे*, सचिव *प्रशांत भिसे* यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्षम सर्व संचालक *दत्तात्रय ठोंबरे, बालाजी कलवले, दत्तात्रय चव्हाण, सतीश गावडे, सतीश दराडे, अनिल शिंदे ,भाऊसाहेब वनवे, संतोष गदादे ,सचिन देवडे, संतोष तरंगे, शशिकांत शेंडे, संजय म्हस्के,किशोर वाघ भारत बांडे, प्रशांत घुले, सदाशिव रणदिवे ,संगीताताई पांढरे ,संजीवनी गरगडे, सुप्रिया आगवणे,मधुकर भोंग* उपस्थित होते.