शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) राजकीय बातमी
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी लि. शिर्डी कडुन संस्थेच्या सभासद बंधु भगिनींना दिपावली - २०२२ निमित्त शिधा व भेटवस्तु, मेंबर डिव्हिडंड, मेंबर व्याज, सभासद ठेव व्याज व सानुग्रह अनुदान वाटप शुंभारंभ मा. ना. सौ. शालिनीताई विखे पा. मा. अध्यक्षा, जिल्हा परिषद अहमदनगर यांचे शुभहस्ते दिनांक १८/१०/२०२२ रोजी करण्यात आला.
सदर प्रसंगी सहाय्यक निबंधक, राहाता श्री. रावसाहेब खेडकर साहेब यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मा. चेअरमन श्री. तुषार शेळके पा. यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. सौ. शालिनीताई विखे पा. होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्था दिपावली निमित्त वाटप करत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना चेअरमन व संचालक मंडळ चांगला कारभार करत असल्याचे नमुद केले त्यामुळेच सभासद बंधु भगिनींना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याचे सांगितले. तसेच संस्थेला याही पुढे मा.ना. श्री. राधाकृष्णजी विखे पा. महसुल व दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा.खा. डॉ. श्री. सुजय दादा विखे पायांचेकडुन संस्थेच्या व सभासदांचे हितासाठी योग्य ते सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.
तसेच याप्रसंगी सहाय्यक निबंधक, राहाता श्री रावसाहेब खेडकर साहेब यांनीहि आपले मनोगत व्यक्त कराताना संस्थेच्या हितासाठी मौलिक सुचना दिल्या तसेच संस्थेचा अधिकाधिक विकास कसा होईल यासाठी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ. श्रध्दाताई कोते पा. यांनीहि आपल्या भाषणात संस्थेचा लेखाजोखा मांडताना दिपावली - २०२२ साठी संस्थेच्या सभासद बंधु भगिनीं व संस्थेच्या कर्मचा-यांना १० किलो साखर, ५ किलो तेल, बासमती तांदुळ, मिठाई व चांगल्या प्रतीचे ब्लॅकेंट चे वाटप तसेच संस्थेच्या सभासद व कर्मच-यांच्या खात्यावर मेंबर डिव्हीडंड - १५% प्रमाणे रु. १,४४,३१५/-, मेंबर वर्गणी व्याज १०% प्रमाणे रु २२,५८,४५२/- सभासद ठेव व्याज १०% प्रमाणे रु १,७३,१८,४९५/- तसेच सेवक ठेव व्याज रु ३,४०, ५६१/- व कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान रु १६,०७,१२८/- म्हणजेच एकुण रक्कम रु २,१६,६८,९५१/- खात्यावर वर्ग केल्याचे विशद केले. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबददल माहिती दिली तसेच याहीपुढे संस्थेच्या सभासद व बंधु भगिनी शिर्डीत येणा-या साईभक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पा. महसुल व दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा.खा. डॉ. श्री. सुजय दादा विखे पा यांचेमुळेच संस्था प्रगती पथावर जात असल्याचे सांगितले. तसेच साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी चे तदर्थ समितीचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधिश, जिल्हा अहमदनगर, तसेच तदर्थ समिती सदस्य, जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच मा. मुख्यकार्यकारी अधिकारी सौ. भाग्यश्री बाणाईत मॅडम (भा.प्र.से) व उप मुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्री राहुलजी जाधव साहेब यांचेबरोबर व सर्व प्रशासकिय अधिकरी यांचेहि नेहमीच चांगले सहकार्य मिळत असते असे भाषण करताना आर्वजुन नमुद केले.तसेच कार्यक्रमाचा समारोप करताना संस्थेचे मा. व्हा. चेअरमन श्री जितेंद्र गाढवे साहेब यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमास मा. सौ. जाधव मॅडम, मा. सौ. उगले मॅडम, तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री दिनेश कानडे, संचालक श्री तुषार शेळके पा श्री प्रतापराव कोते पा. श्री. यादव कोते पा श्री जितेंद्र गाढवे पा. श्री दिपक धुमसे, श्री संदिप बनसोडे, संस्थेचे सचिव श्री. नबाजी डांग पा, सहसचिव श्री विलास वाणी पा यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विकास पाटिल सर यांनी केले.