आर्किटेक्ट वसंतराव माळुंजकर, शहा ब्रदर्स अँड कंपनी, काटकर कंट्रक्शन अँड फर्म यांचे दिवाळी विशेष लेख.
त्यानंतर सर्वात मोठे काम म्हणजे तरंगवाडी गोखळी या परिसरामध्ये पाणीटंचाई भासत होती. त्याच्यावर पर्याय म्हणून रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने सोनाई च्या मागील ओडा ते गोखळी पर्यंत या ओड्यामध्ये ७० लाख रुपये खर्च करून १५० ते २०० खड्डे तयार करून पाणी जिरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. २०१३ पासून या भागातील पाणीटंचाई दूर झाली. या कामासाठी परदेशातूनही ४० लाख रुपये तसेच लोकसभाग करून ही देणगी मिळाली. या कामाची जागतिक स्तरावर रोटरी क्लब मध्ये नोंद झाली. दांडियाची प्रथा या सालापासून चालू करण्यात आली. तसेच गणपती उत्सवामध्ये पोलिसांना जेवण, पालखी सोहळ्याच्या वेळी वारकऱ्यांची सेवा. त्याच काळात ६० रोटरीयन वाढवले. इंदापूर मधील वार्ड मध्ये प्रत्येक सणाच्या वेळी लोकांच्या गाठीभेटी घेऊन शुभेच्छा देणे तसेच लसीकरण करोना शासकीय कार्यक्रम वार्ड मध्ये राबवले. कोरोना काळात गरजू लोकांना धान्य व इतर गरजू साहित्य दिले. इंदापूर येथे बिल्डर लोकांची क्रेडाई ही संस्था स्थापन केली .या संस्थेच्या वतीने दरवर्षी ४०० वृक्षांचे रोपण व संवर्धन केले जाते. वसंतराव माळुंजकर यांनी इंदापूर येथील साई लॉन्स इंदापूर,भारती टॉवर ,शॉपिंग सेन्टरस ,हॉस्पिटल्स ओवनरशिप शहरातील शॉपिंग सेंटर सासवड येथील आंबेडकर भवन भाजी मंडई इत्यादी इमारती त्यांच्या माध्यमातून उभा करण्यात आल्या. तसेच इंदापूर शहरातील अनेक डॉक्टरांचेही इमारती त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. तसेच काही शाळा नारायणदास इंग्लिश मीडियम स्कूल, बेलवाडी येथील देसाई स्कूल ,कदम गुरुकुल, प्रियदर्शनी या शाळांचे त्यांच्या माध्यमातून उभारणी झाली.
दत्त जयंतीच्या वेळी गोखळी येथे त्यांच्या शेतामध्ये दत्ताचे मंदिर असून त्या ठिकाणी हजार ते पाचशे लोकांना यावेळी महाप्रसादही प्रत्येक वर्षी केला जातो. प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथ पारायण वसंतराव माळुंजकर यांच्या घरी संपन्न होतो अशी विविध पैलू अंगी असणारे माळुंजकर हे सर्व क्षेत्रांमध्ये अष्टपैलू नेतृत्व म्हणूनही ओळखले जातात.
कपड्यांची दिवाळीत खरेदी करायची म्हणजे शहा ब्रदर्स अँड कंपनी इंदापूर एक विश्वसनीय दालन होय.
इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या इंदापूर नगरीत वस्त्रदालनाचे भव्य असे कापड दुकान म्हणजेच शहा ब्रदर्स अँड कंपनी चे नाव नावलौकिक आहे.वेगवेगळे सण असो की उत्सव तसेच लग्न सोहळे इत्यादी कार्यासाठी वेगवेगळे वस्त्र खरेदी चे विश्वसनीय दालन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते असे शहा ब्रदर्स हे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले भव्य असे दालन आहे.शहा ब्रदर्स अँड कंपनीच्या गेल्या चार पिढ्या ग्राहकांचा विश्वास संभाळण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणाने करीत असल्याचे दिसते.या दालनामध्ये वधू वर यांचे वेगवेगळ्या प्रकारची कपडे, साड्या पैठणी सारखे मोठमोठ्या साड्या ब्रँड या कंपनीकडे उपलब्ध आहेत.शहा ब्रदर्स अँड कंपनी ची अत्याधुनिक दालनामध्ये सुसज्ज असे कपड्यांची ठेवण, अनुभवी स्टाफ तसेच सर्व वेगवेगळ्या कपड्यांना वेगवेगळे दालन ,लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्तम पद्धतीचे सर्व प्रकारचे कपडे यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी सहज सुलभ होत असते.
वडापुरी गावचे सुपुत्र काटकर बंधू म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व होय.
इंदापूर तालुक्यातील श्री नाथांची कृपा असलेले वडापुरी गावातून या गावात आई - वडील चुलत्यांच्या पुण्याईचामान राखत त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून वडापूरी येथील काटकर वस्तीतील काटकर बंधू म्हणजे ज्ञानेश्वर काटकर, हरिदास काटकर ,भागवत काटकर, रोहित काटकर यांनी काटकर कंट्रक्शन, काटकर फार्म आणि कल्याणता इंटरनॅशन या फार्मची उभारणी केली. याचबरोबर गावांमध्ये तरुण युवकांना व्यवसायात संधी मिळावी म्हणून काटकर शॉपिंग कॉम्प्लेक्स ची उभारणी करून तरुण होतकरू यांचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या फॉर्ममध्ये अनेक युवकांच्या हाताला काम मिळाले. जी स्वतः काम करीत होती तीच मुलं त्या व्यवसायात प्रत्यक्ष झटत इतरांना व्यवसाय भिमुख बनवत या व्यवसायातून राष्ट्र स्तरावरील कामे करू लागली. हरिदास काटकर यांनी आपल्या व्यवसायात आपली कला दाखवत आपल्या व्यवसायाची ओळख देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवून काटकर कंट्रक्शन नावाचा ब्रँड बनवला. त्यांचे चुलते स्वर्गीय शिवाजी काटकर यांचे स्वप्न सत्यात उतरवले. हे यश खरच आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. हे बंधू स्वतः कामात झोकून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या व्यवसायास प्रगतीपथाकडे नेणारे व्यक्तिमत्व असणारे पैलू आहेत. म्हणूनच शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.
*चला साजरी करूया दिवाळी*
प्रसन्न पहाटेच्या वेळी
सडा शिंपूनी अंगणावरती
काढूनिया सुंदर रांगोळी...
चला साजरी करूया दिवाळी
पूजा करूनी गाय वासराची
परंपरा हीच ती वसुबारसची...
चला साजरी करूया दिवाळी
पूजा करूनी धनधान्याची
हीच खरी शेतकऱ्याची धनत्रयोदशी...
चला साजरी करूया दिवाळी
शुभ वस्तू खरेदी करूनी
साजरा करूया पाडवा
जपुया आपापसातील गोडवा...
चला साजरी करूया दिवाळी
शुभप्रसंगी त्या भाऊबीज दिवशी
बहिण आपल्या भावाशी ओवाळी
चला साजरी करूया दिवाळी.
लेखन :गणेश बागल लाखेवाडी. सदस्य भारतीय युवा मोर्चा इंदापूर तालुका