shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नगर तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई दया - दादा दरेकर

प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर : १८ /   गेल्या महिन्यापासून संपुर्ण राज्यासह नगर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे,त्यामूळे शेतकऱ्यांच्या हाता - तोंडाशी आलेला घास पावसाचे हिरावून घेतला आहे .

 मका,बाजरी, भुईमूग,सोयाबीन इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,कोरोनाच्या काळात शेतकरी मोठया अडचणीत सापडला होता,यंदा समाधानारक पाऊस झाला पीके जोमात आली पण मागून सुरु झालेल्या पावसाने पिकांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले, सातत्याने पडणारा पाऊस पिकांची नासाडी करण्यापर्यंत गेला,दिवाळी आली तर पावसाने उघडीप दिली नाही,अजूनही शेतात पाणी साचलेले आहे,त्यामूळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन सरसकट शेतकऱ्यांना भरपाई  द्यावी यासाठी कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे व युवा नेते दादासाहेब दरेकर यांनी नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,नगर तालुक्यातील सर्वच भागाची शेतात जाऊन पाहणी करावी व राज्य सरकारला अहवाल कळवून शेतकऱ्यांची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सामान्य माणसांच्या व शेतकरी वर्गाच्या समस्यांसाठी सातत्याने अभिलाष पाटील घिगे व दादासाहेब दरेकर आग्रही भूमिका घेत असतात,वीजप्रश्न,विम्याचे अनुदान याविषयी अनेकवेळा या नेत्यांनी पाठपुरावा केला आहे,नगर तालुक्यात माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतात तोच बाणा आणि तीच कणखर वृत्ती या नेत्यांनी जोपासली आहे. अशी चर्चा शेतकरी वर्गात रंगू लागली आहे.

         आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी आणि भाजपा असा सामना राज्यात पहायला मिळणार आहे.वाळकी गट गुंडेगावं गणात राजकीय बैठकांना वेग आला आहे,आता जनतेच्या मनात कोणत्या नेत्याचे पावले उमटताना दिसतात हे येणारा काळच सांगणार आहे. पण सध्यातरी राज्यात भाजपची सत्ता असल्याने आघाडी भाजपचा वारु रोखणार का!त्यातच भाजपचे नेते देखील आपल्या जीवाचे रान करताना पहायला मिळत आहे. पावसाच्या निमित्ताने का होईना शेतकरी वर्गाची दखल घेतली जात आहे.

नगर तालुक्यातील सर्व कृषी,महसूल अधिकारी सरकारनने शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बांधावर लावले आहेत मग अधिकारी का उशीर करतात असाही प्रश्न अभिलाष पाटील घिगे आणि दादासाहेब दरेकर यांनी प्रशासनाला विचारला,यावर अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले,यावेळी भाजपाचे सरचिटणीस दिलीप भालसिंग, गुंडेगावं ग्रामपंचायत सदस्य सतिष चौधरी,पै.शरद कोतकर,संतोष दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
close