shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलंबित..!

राज्य सरकारने दिले आदेश..
विभागीय चौकशी सुरू..


श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
श्रीरामपुर  पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे राज्य सरकारच्या आदेशाने निलंबन करण्यात आले आहे. सदर गटविकास अधिकारी यांनी आपले कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन  करण्यात आले आहे. एरव्ही अनेक अधिकारी आपल्या कामातून नाविन्य आणि कल्पकता वापरून विकास कामांसाठी अहोरात्र मेहनत करून कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवितात.परंतु काही अधिकारी नोकरी करायची म्हणून करतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

श्रीरामपूर येथील गट विकास अधिकारी यांचेकडून काय घडले ते पुढीलप्रमाणे उदाहरणार्थ कुठल्याही कामाची तपासणी न करणे,कामात अनियमितता, योजनांची अंमलबजावणी करतांना चुका करणे या घटना धस यांना अडचणीच्या ठरल्या आहेत. निलंबनासह धस यांची विभागीय चौकशी सुध्दा होत आहे.

मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या सुचनेनुसार धस यांनी न्यायालयाचे निर्देशाचे पालन न करता आपल्या मर्जीनुसार विकास कामांना मंजुरी दिली. तसेच घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर न सोडणे, ग्रामपंचायत ऑडिट पॅरे याकडे दुर्लक्ष करणे, संशयित अपहार प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे, स्वच्छ भारत अभियानात अनियमीतता, अनूसुचित जाती व बौद्ध घटकांचा विकास योजनेत अनिमितता करणे, पानंद रस्त्यांच्या कामांना मान्यता देवून ते वेळेत पुर्ण न करणे.आढावा बैठक न घेणे, विकास कामांवर लक्ष न ठेवणे आदी ठपका धस यांच्यावर आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी धस यांच्याबाबतीत तक्रारी झाल्यानंतर धस यांच्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार सदर कार्यवाही झालेली आहे.
close