shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री मंगेश चिवटे व श्री संजय आवटे यांनी परस्परांशी साधला ह्रदय स्पर्शी संवाद व एकमेकांशी आदर व्यकत करून भुतकाळाच्या आठवणी जाग्या केल्या !!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मा. काशिनाथ भतगुणकी सरांमुळे ब-याच कालावधीनंतर माझी मार्गदर्शक मा.संजयजी आवटे सरांशी भेट झाली.

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन ऑफ इंडिया व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन व‌ डॉ.कलाम मिशन आयोजित राज्यस्तरीय डॉ.कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा सन्मान सोहळा-२०२२ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मा.काशिनाथ भतगुणकी व मा.सौ.संगिता पाटील यांच्या आग्रही निमंत्रणामुळे मिळाले. यावेळी मा.संजय आवटे (संपादक, दै.लोकमत पुणे), मा.डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (उपमहासंचालक यशदा, पुणे), मा.डॉ.बबन जोगदंड (प्रभारी अधिकारी,प्रकाशन), मा.नवनाथ येवले (येवले अमृततुल्य), मा.दत्तात्रय निडवंचे (नादब्रह्म इडली) ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. सर्वांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.

हा कार्यक्रम माझ्यासाठी विशेष याकरिता ठरला माझे मार्गदर्शक दै.लोकमतचे पुणे येथील संपादक मा.संजयजी आवटे या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब-याच दिवसांच्या कालावधीनंतर त्यांच्याशी भेटण्याचा योग जुळून आला. अगदी मनमोकळ्या पद्धतीने आपल्या खुमासदार शैलीत मित्राच्या नात्याने सरांनी माझी फिरकी घेत वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. आम्ही दोघेही करमाळ्याचे असल्या कारणाने करमाळ्यासहीत सोलापूरच्या अनेक वैशिष्ट्यांवर सरांनी भाष्य केले. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

शहाजीबापू काय आणि मंगेश चिवटे काय ! !

दोघेही आमचे सन्मित्र आणि गाववालेही. 

पण, दोघांमध्ये फरक असा की, बापू थेटपणे गुवाहाटीचे डोंगर, झाडी, हाटील वगैरेविषयी बोलतात. 

मंगेश चिवटे मात्र ताकास तूर लागू देत नाहीत. 

'तो मी नव्हेच' असे म्हणून मोकळे होतात! 

असो. 

तर, मंगेश हा माझा जुना सन्मित्र. तो स्वतःचा उल्लेख माझा विद्यार्थी वगैरे करत असला तरी मलाही अवगत नसणारी अनेक कौशल्ये त्यानं अल्पावधीत आत्मसात केली आहेत. पण ते सोडा. 

Mangesh Chivate आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'ओएसडी' आणि अत्यंत निकटवर्तीय असणा-या मंगेशनं आरोग्याच्या क्षेत्रात खूप महत्त्वाचं काम उभं केलंय. गोरगरीबांना स्वस्तात आणि मोफतही आरोग्यसुविधा, वैद्यकीय मदत देण्यात त्याचा हात कोणीही धरू शकणार नाही. सरकार आणि पक्ष अशा दोन्ही स्तरांवर मंगेश हे काम करतोय. 

मंगेशचा आज सत्कार करताना छान वाटत होतं. 

काशीनाथ भतगुणकी या आमच्या मित्राच्या 'ड्रीम फाउंडेशन'नं 
Kashinath Bhatagunaki बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या मेळाव्याच्या निमित्तानं मंगेश भेटला. मग छान मैफल जमली. 
भाषणंही अर्थातच रंगली. 

'सरांचं बोट धरून इथवर आलो', असं मंगेशनं आधीच सांगितलं. मग मीही, अंधेरीत उदयाला आलेली, मोहेंजोदडोपेक्षाही प्राचीन अशी राजकीय संस्कृती जपत साखरपेरणी केली !! 

१८५७ ते गुवाहाटी अशा क्रांतीची सम्यक मांडणी केली !!

मंगेशला आता चहावाल्यांविषयी ममत्व वाटू लागल्याने 'येवले चहा'चे सर्वेसर्वा नवनाथ येवले व्यासपीठावर सोबतीला होते. 'नादब्रह्म इडली'चे दत्तात्रय निडवंचेही होते. डॉ. बबन जोगदंड Baban Jogdand, आतिश सोसे - Atish Suresh Sose, अनिरुद्ध बडवे, श्रीक्षेत्र थेऊरचे सरपंच युवराज काकडे, सुयश राऊत, राधा होमकर असे स्नेही.  

अनेकजण आवर्जून आलेले. 

खूप दिवसांनी जुन्या मित्रांना भेटता आलं. मग 'संदीप'मध्ये मजबूत खाणं झालं. भाकरी आणि शेवग्याची भरली शेंग चुरून वगैरे. वर पुन्हा गावरान तूप. आहा !!

तीसेक मित्रांचा मेळा सोबतीला होता. इतकी वर्षं झाली, पण अद्याप एकही मित्र आमचा गट सोडून गुवाहाटीला गेलेला नाही, हे किती छान!
close