shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

छत्रपती शिवराय हे उत्तम प्रशासक व आदर्श लोकराजे - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


 *ब्रह्मपुरी येथे शिवजयंती - शिवपालखी सोहळा व प्रबोधनपर कार्यक्रम

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:
संपूर्ण जगात ज्यांच्या अजरामर कीर्तीची महती गायली जाते. शंभरहून अधिक विद्यापीठांमध्ये ज्यांच्या कारकिर्दीचा इतिहास शिकविला जातो असे छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक, न्यायप्रिय व आदर्श लोकराजे होते. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे छत्रपती फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवराय ते भिमराय या प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित शिवराय ते भिमराय या प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विधानसभा विरोधी पक्षनेते तथा विजय वडेट्टीवार , अध्यक्ष म्हणून काॅंग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी ,तर प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प. माजी सभापती डॉ.राजेश कांबळे, ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक ॲड. गोविंदराव भेंडारकर, हसन गिलानी, नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, ओबीसी विचारवंत भाऊराव राऊत, रयत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा.राकेश तलमले, मराठा सेवा संघाचे खेमराज तिवाडे, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष रवि मेश्राम, शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अनुकूल शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, सामाजिक कार्यकर्ते निनाद गडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिवराय ते भीमराय यावर आधारित प्रबोधनपर गीतांचा व पोवाडा कार्यक्रम कार्यक्रमाचे सादरीकरण 'मी वादळवारा फेम', राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर, 'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं' फेम, सुप्रसिध्द गायिका कडुबाई खरात, सांगली येथील शिवशाहीर प्रबोधनकार सुरेश सुर्यवंशी, सिनेअभिनेत्री तथा सुप्रसिद्ध गायिका कोमल धांदे यांनी केले. याप्रसंगी शिवजन्मोत्सवानिमित्ताने अथक परिश्रम घेणारे तथा समाजसेवेत अग्रेसर असणारे सुधीर पंदीलवार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांनी केले. सुत्रसंचलन सुरज तलमले, आभार सुरज मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवछत्रपती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 नगरपरिषद आवारातील छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
 
ब्रम्हपूरी येथील नगरपरिषदेच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचा अनावरण सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

 *ढोलताशांच्या गजरात पालखी सोहळा

ब्रम्हपूरी नगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी स्वराज्य वाद्य पथक यांच्या ढोलताशांच्या गजरात शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणांनी शहर दुमदुमले होते.

*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close