shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी ११ मार्च पर्यंत विशेष मोहीम..


*आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने  ११ मार्च २०२४‌ पर्यंत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानातंर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 


या मोहिमेचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.‌
            इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी देणारे विद्यार्थी, सेवा व निवडणुक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
            या विशेष मोहिमेंतर्गत जात वैधता प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्याच्या दृष्टीने जलद गतीने सुनावण्या, त्रुटी प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही होण्यासाठी त्रुटी निवारण शिबीरे, दक्षता पथक शिबीरे, जातवैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर, ऑनलाईन वेबिनार, जातवैधता प्रमाणपत्र वाटप किंवा पालकांना एसएमएस व ई-मेलद्वारे याबाबत सूचना देण्यात येतील. या विशेष मोहिमेअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ विद्यार्थी व अर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

*रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -  9561174111*
close