shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एल.जी बनसुडे विद्यालयात 'मराठी राजभाषा ' दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला*

*एल.जी बनसुडे विद्यालयात 'मराठी राजभाषा ' दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला* 
इंदापूर:पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयात (दि.२७)रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर मराठी साहित्यिक  वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता ६वी ते ११ वी निबंध स्पर्धा,कविता वाचन स्पर्धा तसेच इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा  आयोजित करून या दिनी मराठी राजभाषेचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री हनुमंत बनसुडे , उपाध्यक्ष शितल कुमार शहा, कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे, सचिव श्री. नितीन बनसुडे सर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्राचार्या सौ. वंदना बनसुडे मॅडम यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित केले  तसेच वैभव काळे सर व सुनील बांडे सर यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक श्री.राहुल वायसे सर, सर्व विभाग प्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .प्रकाश दरदरे सर यांनी केले व आभार सौ.सीमा बाराते मॅडम यांनी मानले.
close