shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये हर्षदा गरुडला सुवर्ण तर योगिता खेडकरला कांस्यपदक


पाथर्डी प्रतिनिधी:

राजीव गांधी विद्यापीठ,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स,वेटलिफ्टींग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गरुड हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना  ४५ किलो वजन गटात एकूण १४३ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तर योगिता खेडकर हिने ८७ किलो वजन गटात एकूण १७६ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. या आधी हर्षदा गरुड हिने धर्मशाला येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते तर योगिता खेडकर हिला बेंगलोर येथे झालेल्या  खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे  मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बी. ए. चौरे यांनी या खेळाडूंचे  अभिनंदन केले.

*वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close