shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नगरमध्ये बहुजन रयत परिषदेचासंवाद मेळावा उत्साहात संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
मंगळवार दिनांक २७ फेब्रूवारी २०२४

नगरमध्ये बहुजन रयत परिषदेचासंवाद मेळावा उत्साहात संपन्न..!!


अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बहुजन रयत परिषदेचा संवाद मेळावा अहमदनगर येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
    कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले,  या संवाद मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की छ.शिवाजी महाराज जयंती तसेच संत गाडगे महाराज जयंती चे  औचित्य साधून सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात  आला.

    ता.२५ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११ वा. बहुजन परिषद रयत या संघटनेची उत्तर महाराष्ट्र. येथील पदाधिकाऱ्यांची .बैठक अहमदनगर या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून.संघटनेचे संस्थापक प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब.व माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब.व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष सौ कोमल ताई साळुंखे. हजर होते यावेळी खालील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री ईश्वर क्षीरसागर प्रदेश सरचिटणीस. प्रदेश संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय पाटील .प्रदेश उपाध्यक्ष श्री ना.म साठे. श्री सिद्राम जावीर. प्रदेश कार्यकारणी सदस्य. श्री साहेबराव शृंगार. अध्यक्षउत्तर महाराष्ट्र , श्री रवींद्र पाटील संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र,श्री अनिल बाविस्कर कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,श्री सुरेश आबा वाघमारे अध्यक्षपश्चिम महाराष्ट्र बंडू पवार,जिल्हाध्यक्ष सोलापूर चंदू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर,श्री अमित तांबे शहराध्यक्ष सोलापूर श्री योगेश येडाळे जिल्हाध्यक्ष धाराशिव, श्री अंबादास आहिरेशहराध्यक्ष नाशिक ,संघटनेची पुरुष व महिला पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते. 

    यावेळी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. श्री रवींद्र सखाराम कनगरे जिल्हा युवक अध्यक्ष,अबोली सकट जिल्हा युती अध्यक्ष अहमदनगर,कुमारी वैष्णवी ताकवणे. जिल्हा विधी कायदे सल्लागार अहमदनगर,श्री राजू थोरात. जिल्हाध्यक्ष नाशिक,श्री संजय भिसे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर, श्रीमती मंदाताई ढोकळ जिल्हा महिला अध्यक्ष अहमदनगर,रणजित जाधव, 
विशाल जेम्स ससाणे, काका आढगळे राहुरी उपाध्यक्ष,कैलाश भास्कर जगधने राहुरी शहर अध्यक्ष,संगीता शिरसाठ नगर महिला शहर प्रमुख भीमराव बत्तीशे (गंगापूर तालुका अध्यक्ष),प्रवीण शेलार (श्रीरामपूर तालुका युवा अध्यक्ष),आकाश कनगरे (वैजापूर तालुकाध्यक्ष),अशोक शेलार (श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष)
     गुलाब विधाते राहुरी तालुका उपाध्यक्ष पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र देऊन  त्यांचे स्वागत करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीमान ना.म.साठे सर यांनी केले .  सूत्रसंचालन श्री राहुल जाधव सर व रवींद्र कणगरे  यांनी केले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close