shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लातूरचे पत्रकार मुहम्मद मुस्लिम कबीर "पीस ॲम्बेसेडर आयकॉनिक अवाॅर्ड्स"चे मानकरी


*समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करणे हे मोठे काम - वाडकर

मुंबई - लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद, मुंबई आणि टी.एम.जी.क्रिएशन मुंबई यांनी गेल्या पाच वर्षांपासून जीवनाच्या विविध क्षेत्रात अमूल्य सेवा आणि कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना राज्य/राष्ट्रीय स्तरावर "टीएमजी पीस ॲम्बेसेडर आयकॉनिक  पुरस्कार" प्रदान केले आहे. 


या वर्षी लातूर जिल्हा उर्दू मीडियाचे अध्यक्ष व पत्रकार मुहम्मद मुस्लिम कबीर यांना त्यांच्या पत्रकारितेतील आणि साहित्यिक सेवेची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील "टीएमजी पीस ॲम्बेसेडर आयकॉनिक ॲवॉर्ड" देऊन गौरविण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, दुसरा मजला, आझाद मैदान, महानगर पालिका रोड, सीएसटी मुंबई येथे या भव्य कार्यक्रमात देवेंद्र भुजबळ (संचालक, माहिती विभाग, महाराष्ट्र शासन), जयंत वाडकर (मराठी चित्रपट अभिनेते) सुनीता नाशिककर (पोलीस उपअधीक्षक मुंबई), अमृता उत्तरवार, (मराठी चित्रपट अभिनेत्री), झाकीर खान (चित्रपट अभिनेता) सीमी उर्फ ​​शकीला शेख, डॉ. जालंधर महाडिक, कुणाल भोईर, डॉ. राजेश येवले,मोहन बडगुजर (आयकॉन फाऊंडेशन मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद, मुंबई आणि टीएमजी क्रिएशन मुंबईचे प्रमुख नासिर खान यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. लोक गौरव परिषद, मुंबई ने नेहमी गुणवंतांना प्रोत्साहन दिले आहे. केवळ उच्च शिक्षितच नाही परंतु अशिक्षित प्रतिभावान लोकांना देखील आज पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. लातूर जिल्ह्यातील पत्रकार मुहम्मद मुस्लीम कबीर यांच्याशिवाय साप्ताहिक अबुल कलाम (हिंदी) चे मुख्य संपादक मुश्ताक हाश्मी यांनाही त्यांच्या सामाजिक कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.अब्दुल हमीद मुहम्मद जी विजापूरे यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून नासिर खान व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले व समाजातील मागासलेल्या व उपेक्षित घटकातील कलागुणांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे हेच मोठे कार्य असल्याचे सांगितले. यावेळी दर्शना माळी व कमल डांगे यांनी सभेचे उत्तम सूत्र संचालन केले, कार्यक्रमाचे आयोजक सलमा खान यांनी आभार मानले.
या सभेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
*पत्रकार अजिजभाई शेख राहाता
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close