shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर - ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात ३५ ज्येष्ठ नागरिकांनी केली रक्त तपासणी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपुर येथील ज्येष्ठ नागरीक आनंद मेळावा आणी डॉ.शिरसाठ पॅथोलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ३५ ज्येष्ठ नागरीकांनी आपली रक्त तपासणी करुन घेतली.
वैद्यकीय क्षेत्रात (पॅथोलॉजी लॅब) अग्रस्थानी असलेल्या डाॅ.अर्पुवा शिरसाठ यांच्या हस्ते सदरील शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या प्रसंगी डाॅ. दिलीप शिरसाठ, डाॅ.स्वरूप शिरसाठ तसेच ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा चे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम (सर), व प्रा.शंकरराव अनारसे, दामोदर जानराव, प्रभाकर भोंगळे, प्रा.सुभाष लिंगायत, बाबा दिघे, राम बोबडे लेविन भोसले बाळासाहेब नेहे, साहेबराव कपिले, श्रावण पाटील अकोलकर,अब्दुल पठाण आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. 
यावेळी बोलताना डॉ.अपुर्वा शिरसाठ म्हणाल्या की, दररोजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो मात्र हेच दुर्लक्ष पुढे गंभीर आजारांची कारणे ठरतात, करीता प्रथमतः आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे खुपच आवश्यक तथा गरजेचे आहे, तसेच ज्येष्ठ नागरीकांनी तर खुपच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,जरासा जरी त्रास जाणवत असेलतर तात्काळ प्रथमतः आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे तसेच वरचेवर योग्य त्या तपासण्या करणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच केवळ ज्येष्ठ नागरीकांनाच नव्हेतर तरूणांना देखील मधुमेह,बी.पी.सारखे. आजार सध्या होत आहेत, यासाठी त्यांनी देखील आवश्यक तपासण्या वर्षातून किमान दोन वेळा कारणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.


यानंतर डाॅ. दिलीप शिरसाठ, डाॅ.स्वरूप शिरसाठ यांनी शिबिराचे महत्व विशद केले. ज्येष्ठ नागरीक आनंद मेळावा चे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम सर यांनी सर्वाचे स्वागत करत जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आरोग्यासंबंधी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल डाॅ. अर्पुवा शिरसाठ व त्यांचे सहकारी डाॅक्टर्स आणी स्टाफचा सत्कार केला. 

याप्रसंगी ३५ ज्येष्ठ नागरिकांनी सदरील शिबिरात आपली रक्त तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर भोंगळे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा.सुभाष लिंगायत यांनी केले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 
9561174111
close