shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मेळावा उत्साहात संपन्न; लाभार्थ्यांचा मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या मेळावा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अहमदनगर येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 
यावेळी प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहायक संचालक राधाकिसन देवढे, ॲड अरुण जाधव, बाबासाहेब भोयटे, अशोक चोरमले आदींची उपस्थिती होती.

या मेळाव्यात भारत सरकार शिष्यवृत्ती, धनगर समाजाच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी, मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल वितरण तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.
मेळाव्यास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close