shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गोकुळदास साळवे यांचा संत रविदास युवा रत्न महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मान


अहमदनगर प्रतिनिधी:
सकल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य,सम्राट अशोक विचार मंच आणि संत रविदास सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले,संत शिरोमणी गुरू रविदास जी महाराज यांच्यासह महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. अशा संस्था प्रमुख, संघटनेचे पदाधिकारी व समाज सेवक यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

अहमनगर शहरातील सक्कर चौक येथील ओम गार्डन मध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते चर्मकार संघर्ष समितीचे सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख गोकुळदास साळवे यांना संत रविदास युवा रत्न महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मीराताई शिंदे, माजी नगरसेवक अशोक कानडे, दिनेश देवरे, सुर्यकांत गवळी,भाऊलाल निंभोरे, गोविंदराव खटावकर, कार्यक्रमाचे संयोजक निलेश बांगरे,विजय घासे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
श्री.शिवाजीराव साळवे संस्थापक अध्यक्ष चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळदास साळवे यांनी राज्यातील समाज बांधवाकरिता सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले.फक्त चर्मकार समाजाचे प्रश्न, अडचणी विचारात न घेता सर्व समाजातील बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहून काम केले. त्यांना समाजात काम करताना श्री.शिवाजीराव साळवे आणि संघटनेतील सर्व पदाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.श्री संत शिरोमणी रविदास महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. महापुरुषांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले.मला माझ्या कार्यासाठी माझे कुटुंब, माझे सर्व गावकरी, सरपंच, चेअरमन सर्व सदस्य,माझे सहकारी, नातेवाईक यांनी मोलाची साथ दिली.
परिवर्तनाच्या चळवळीत मी काम करतो या पुरस्काराने मनाला आणखी उभारी येईल . पुरस्काराच्या रुपाने मला सर्व समाज बांधवांना एकत्र करुन यापुढील काळात चांगले काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळेल आणि आपली साथ कायम राहील अशी आशा व्यक्त करतो..मला सामाजिक क्षेत्रातील माझे सहकारी ,माझे नातेवाईक, समाज बांधव व तसेच आदर्श गाव वाडेगव्हाण ग्रामपंचायत सरपंच व सन्माननीय सदस्य  या सर्वांच्या सहकार्याने ,मार्गदर्शनाने,हे सर्व करू शकलो आहे असे गोकुळदास साळवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जाऊआहे.

*पत्रकार सौ.सुनंदाताई शेंडे - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close