shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

केज शहरातील रस्ते विकासासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत आणखी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर



केजचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील - आ. नमिता मुंडदा!! 

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

 केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या कार्यकुशलतेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. आ. मुंदडा यांनी केलेल्या अविरत पाठपुराव्यामुळे केज शहरासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत रस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित कामांसाठी ३५ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यानिमित्ताने पहिल्या टप्प्यातील कामांच्या शुभारंभ प्रसंगी आ. मुंदडा यांनी केज शहरासाठी आणखी भरघोस निधी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. 



वेगाने वाढणाऱ्या केज शहरात दर्जेदार रस्ते असावेत याकडे आ. नमिता मुंदडा यांनी विशेष लक्ष दिले आहे. रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन शहरात सिमेंट कॉंक्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन केज शहरात पहिल्या टप्प्यात सिमेंट कॉंक्रीटचे पाच रस्ते तयार करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून तब्बल ७५ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. हि कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यानंतरही आ. मुंदडा यांनी उर्वरित रस्त्यांसाठी शासन पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यालाही यश आले असून केज शहरासाठी दुसऱ्या टप्प्यात सिमेंट कॉंक्रीटचे बारा रस्ते तयार करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून ३५ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे रस्ते देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. त्यामुळे केज शहरातील बहुतांशी प्रमुख रस्ते आता खड्डेमुक्त होणार असून नागरिकांना सिमेंट कॉंक्रीटचे मजबूत रस्ते मिळणार आहेत. केजच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी विशेष आभार मानले आहेत. 


केज शहराचा चेहरामोहरा बदलणार

स्व. विमलताई मुंदडा यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे अनुकरण करत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी प्रयत्नशील आहे.  केज शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील असून इतर अत्यावश्यक विविध विकासकामांसाठी देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा मतदार संघ

close