shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्यात इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा- आमदार दत्तात्रय भरणे .

बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्यात  इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा- आमदार दत्तात्रय भरणे .
इंदापूर:- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले असलीची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. 
 दि. २व ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळे दरम्यान विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय विद्यानगरी बारामती (ता. बारामती, जिल्हा पुणे )बारामती एमआयडीसी बारामती येथे  पुणे विभागस्तरीय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नमो महारोजगार 
 मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे . सदर नमो महारोजगार मेळाव्यामध्ये  नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.दहावी ,बारावी , आयटीआय, पदविका, पदवीधर, पदवीत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या  तेथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी देणार आहेत. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगारांच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होतील. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
close