shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या 103 कामगारांना न्याय - गटनेते कैलास कदम.

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या 103 कामगारांना न्याय - गटनेते  कैलास कदम.
    इंदापूर:- 28 फेब्रुवारी 2024 रोजी नगरविकास विभागाचा शासन निर्णय होऊन इंदापूर नगरपरिषद आस्थापनातील अनियमित कामगारांना नियमित करण्याचा शासन निर्णय झाला.अनियमित कामगारांना नियमित करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे पहिल्यापासूनचे प्रयत्न होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे कामगारांना न्याय मिळाला असल्याचे इंदापूर नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.
    कैलास कदम म्हणाले की ,' 2007 पूर्वी 103 कर्मचारी अनियमित होते .कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा बिंदू नामावलीचा प्रश्न निर्माण झाला होता .माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये इंदापूर नगर परिषदेमध्ये सत्ता आली. 2007 ते आजपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगर परिषदेमध्ये सत्ता आहे .त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचा रचनात्मक विकास झाला आहे. सुरुवातीला अनियमित कर्मचाऱ्यांचे पगार देखील सात ते आठ महिने थकीत राहत होते. हर्षवर्धन पाटील यांनी या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार नियमित होण्यासाठी प्रयत्न केले. हा प्रश्न श्रेयवादाचा नसून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दूरदृष्टीने, सातत्यपूर्ण लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यातूनच 103 कर्मचाऱ्यांच्या नियमित होण्याचा मार्ग यशस्वी होऊन त्यांना न्याय मिळाला आहे .
   यावेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील , भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद , माजी नगरसेवक शेखर पाटील उपस्थित होते
close