shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नगर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी..

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
लोकसभा सार्वत्रिक नुवडणूक 2024 या निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 16 मार्च, 2024 रोजी जाहीर केलेला असुन त्यानुसार निवडणूकीच्या प्रक्रियेस 16 मार्च, 2024 पासून सुरुवात झालेली आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाने 37 - अहमदनगर लोकसभा मतदार संघ व 38 - शिर्डी या लोकसभा मतदार संघाची निवडणूकीसाठी दिनांक 16 मार्च ते 6 जुन, 2024 या कालावधीसाठी आदर्श निवडणूक आचार संहिता लागू केलेली आहे. मा.भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 324 खाली प्रदान केलेले अधिकाराचा वापर करुन सदर निवडणूका विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासारठी निवडणूकीच्या काळात लाऊड स्पिकर वापरण्यावर आयोगाने प्रतिबंध केला आहे. सर्व संबंधितांना नोटीसा देऊन त्यांचे म्हणने ऐकुण घेणेसद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहे.
सिध्दाराम सालीमठ, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश काढण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदार संघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजले पासून ते रात्री 22 वाजे पर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन करता येईल, असा वापर करत असतांना वाहन चालू ठेऊन ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनक्षेपकाचे वापरास दररोज सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 22 वाजे पर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी/निवडणूकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर बाबत संबंधितांनी ध्वनीक्षेपकाचे वापराचे परवानगी विवरण मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाची कोणीही कोणत्याही प्रकार भंग केल्यास ती व्यक्ती  भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. सदर बंदी आदेश हा दि. 16 मार्च 2024 पासून अहमदनगर जिल्ह्यात सर्व लोकसभा मतदार संघाचे हद्दीत दिनांक 11 मे 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमलात राहील.असे कळविण्यात आले आहे.


*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close