फोटो:- इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते तालुक्यातील नोटरीपदी निवड झालेल्या 40 पेक्षा अधिक वकिलांचा सत्कार करण्यात आला
इंदापूर : प्रतिनिधी दि.18/3/24
इंदापूर तालुक्यातील 40 पेक्षा अधिक वकिलांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाली आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. इंदापूर तालुक्यातील वकिलांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणावरती झालेल्या नोटरीपदी निवडीबद्दल आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.18) काढले.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील नोटरी पदी निवड झालेल्या 40 पेक्षा अधिक वकिलांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील गौरवोद्गार काढले.
ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुका बार असोसिएशनचे कामकाज कौतुकास्पद असे आहे. नोटरीपदी निवड झालेल्या वकिल बांधवांनी सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम करावे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मीही लॉ चे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, याचा मला अभिमान आहे. हा व्यवसाय चांगला आहे, लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. नोटरी पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. तसेच न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता आपल्या माध्यमातून वाढावी, अशी अपेक्षाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नोटरी झालेल्या वकिलांशी संवाद साधला व त्यांच्याशी विविध विषयावरती चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नोटरी पदी निवड झालेल्या सर्व वकील बांधवांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
.