shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लऊळ येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिरात मूर्ती स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

लऊळ येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिरात मूर्ती स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
इंदापूर:- लऊळ ता. माढा जि. सोलापूर येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिरातील मूर्ती स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण अखंड हरिनाम सप्ताह दि. ५ मार्च २०२४ ते ११ मार्च २०२४ पर्यंत सप्ताहाच्या आयोजन केले आहे.
 यामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ महापूजा ,सकाळी ७ ते ८ आरती, सकाळी ९ ते ११ संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण ,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ ,सायंकाळी ७ ते ७:३०  आरती, सायंकाळी ८ ते १० किर्तन, रात्री ११ नंतर हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण श्री राजाराम महाराज आतकर लऊळ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तर या सप्ताह सोहळा मध्ये कीर्तन सेवा ह.भ. पा. वैजनाथ महाराज कदम व्हाळे, अशोक महाराज जगताप चौबे पिंपरी, उद्धव महाराज गरड लऊळ, नागनाथ महाराज रेडे कुर्डू, धनंजय महाराज लोखंडे करमाळा, अजिनाथ महाराज गरड लऊळ, तसेच काल्याचे किर्तन वैष्णवी ताई महाराज महारनोर टेंगले श्रीगोंदा यांचे होणार आहे.
 सोमवार दि. ११ मार्च रोजी बाबुराव महाराज ढोणे वाघापूर यांच्या दुपारी १२ ते १ वाजता भाकणुकीचा कार्यक्रम होईल.
 या सप्त्यातील अन्नदाते मंगळवार दि.५ मार्च रोजी मौजे वडापुरी ग्रामस्थ व मोजे वांगी ग्रामस्थ बुधवार ६ मार्च रोजी मौजे लवूळ ग्रामस्थ व मौजे सुरवड ग्रामस्थ, गुरुवारी दि. ७ मार्च रोजी मौजे अरण ग्रामस्थ व मौजे वकील वस्ती ग्रामस्थ शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी मौजे उजनी ग्रामस्थ मौजे देवडी ग्रामस्थ शनिवारी दिनांक ९ मार्च रोजी मौजे वाकवड वंजारवाडी ग्रामस्थ तालुका भूम व मौजे मोहोळ ग्रामस्थ रविवारी दिनांक १० मार्च रोजी मौजे पिंपळखुटे ग्रामस्थ व मौजे वडापुरी ग्रामस्थ तर काल्याचा महाप्रसाद संजय नामदेव गावडे लऊळ यांच्या वतीने होणार आहे .दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता श्री संत सद्गुरु बाळूमामा पालखी मिरवणूक निघणार असल्याचेही सदर जाहिराती पत्रकात नमूद केले आहे.
close