shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

रेने नोरोन्हा - भारतामधील सर्वात तरुण महिला आयर्नमॅन ॲथलीट


मुंबई प्रतिनिधी:
रेने नोरोन्हा ही १८ वर्षीय भारतीय नागरिक असून मद्रासमधील आयआयटीची प्रथम वर्षाची पदवीधर विद्यार्थिनी आहे. २ मार्च २०२४ रोजी आयोजित आयर्नमॅन एनझेड स्पर्धेत तिने १८ ते २४ या वयोगटात ५ वे स्थान मिळवले. या स्पर्धेतील ती सर्वात तरुण स्पर्धक होती. सर्व अडथळ्यांना आव्हान देत, सक्षम बनण्याच्या तिच्या ध्येय, विश्वास आणि समर्पणामुळे तिची कामगिरी प्रशंसनीय आहे. 

रेने नोरोन्हाच्या यशस्वी वाटचालीतून देशातील महिला खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. 
शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी न्यूझीलंड मधील टाउपो येथे आयोजित २०२४ आयर्नमॅन स्पर्धेत चाळीसहून अधिक देश आणि प्रदेशांतील दोन हजाराहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण या स्पर्धा कार्यक्रमाचा चाळीसावा वर्धापनदिन साजरा होत आहे.

न्यूझीलंड देशामध्ये सर्वात मोठे तलाव असलेल्या ताउपो तलावामध्ये ३.८ किमी पोहणे, ताउपोच्या आजूबाजूच्या ग्रामीण लँडस्केपमध्ये १८० किमीची सवारी करणे तसेच लेकफ्रंट बाजूने ४२.२ किमी धावणे हे खास वैशिष्ट्य आहे.

 रेनेला प्रेरणा आणि प्रशिक्षण दिल्याबद्दल तिचे ट्रायथलॉन प्रशिक्षक शंकर थापा तसेच ट्राय ट्रूपर्सच्या संघाचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. रेनी सोबत शंकरने सुध्दा ही खडतर शर्यत पूर्ण केली, हे समर्पण आणि खिलाडूवृत्तीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शंकर हे अनुभवी प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक आयर्नमॅन, अल्ट्रामॅन शर्यत, कॉमरेड्स तसेच विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. 
रेने नोरोन्हाचे धाव प्रशिक्षक राज वडगामा, जीएससी मधील अल्ट्रा मॅन रेस स्पेशालिस्ट, गोरेगांव स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक मुर्गेश सर, फिजिओथेरपिस्ट मिशेल मिनेझिस, प्राची सत्रा आणि अंकिता मातोंडकर, पोडियाट्रिस्ट पल्लवी सिंग, आहारतज्ञ कृष्णी चेड्डा आणि क्रीडा समुपदेशक अमरू तसेच क्रिडा विषयक सल्लागार अमृता कारखानीस या सर्वांचे त्यांच्या अमुल्य योगदानासाठी मन:पूर्वक आभार!

ट्रायथलॉन हा खेळ स्विकारण्याआधी रेने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ. मोहन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक जिम्नॅस्ट म्हणून अकरा वर्षे प्रशिक्षण घेत होती. क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी रेनेला पाठबळ व प्रेम देणारे तिचे कुटुंब, मित्र परिवार व हितचिंतक यांचे विशेष आभार. पुन्हा एकदा रेनेचे खूप खूप अभिनंदन. लवकरच रेने नोरोन्हा या नावाची नोंद सर्व विक्रम पुस्तिकांमध्ये व्हावी, अशी मन:पूर्वक आशा बाळगतो. क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी नेरे नोरोन्हाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

*ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत -  मुंबई
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close