shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूरकरांनी आज पर्यंत साथ दिली यापुढेही द्यावी -सुनेत्रा पवार

इंदापूरकरांनी आज पर्यंत साथ दिली यापुढेही द्यावी -सुनेत्रा पवार 
इंदापूर :  छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून अजित पवार यांनी आपली राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी सुरुवात केली त्यानंतर  राजकारणात त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.  ते यशोशिखरापर्यंत  पोहोचले. त्यामुळे इंदापूरकरविषयी अजित पवारांच्या मनात विशेष प्रेम आहे. यापुढेही अशीच साथ इंदापूरकरांनी द्यावी असे आवाहन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी  केले. 

सुनेत्रा पवार या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूर शहरात  जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाची एक दिवसीय कार्यशाळा तसेच  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या  बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  जी विकासात्मक   खूप चांगली कामे  त्यांनी आजपर्यंत केली  आहेत. ते केवळ आपल्या साथ देण्यामुळेच. हेच आपले   आम्हांस पाठबळ व  ऊर्जा देणारे असून  पुढील काळात देखील आपल्यावरती जी जबाबदारी देण्यात येईल ती आपण पार  पाडाल अशी खात्री बाळगते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, प्रतापराव पाटील,  तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे ,ॲड.शुभम निंबाळकर ,रहेना मुलाणी,श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले ,सचिन सपकाळ, श्रीराज भरणे ,संदेश देवकर, बाळासाहेब ढवळे यांच्यासह महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या उमेदवार सुनेत्रा पवार या 15 दिवसांपूर्वी जाहीर झाल्या आहेत असे जाहीर भाषणात सांगितले.
close