shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा तेजीत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने सध्या खिरापतीसारखे पुरस्कार वाटले जात आहेत. साधारणतः ५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेवून हे पुरस्कार विकले जातात. इतकेच नव्हे तर फिल्म इंडस्टीशी कोणताही संबंध नसणाऱ्यांचे बनावट बायोडेटा बनवले जातात व त्यांना हे पुरस्कार विकले जातात, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या (ईग्लिंश  वृत्तपत्र) हाती आलेली आहे.

फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंताला 'दादासाहेब फाळके' Dadasaheb Phalke या नावाने पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारतीय सरकारतर्फे दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार अमिताभ बच्चन, अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, देविका राणी, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, विनोद खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांना दिलेला होता. त्यामुळे हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा व भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानला जात असे.

सध्या या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा सुरु आहे. कल्याण जाना, कृष्णा चौहान, अखिलेश सिंह यांनी दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार सुरु केले आहेत. साधारणतः ५ हजारापासून ते ५० हजारापर्यंत पैसे घेऊन हे पुरस्कार 'विकले' जातात. फिल्म इंडस्ट्री, एंटरटेनमेंट या क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसणाऱ्यांनाही हे पुरस्कार विकले जातात, यामुळे या पुरस्काराचे अवमूल्यन होत आहे. 

दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारतीय सरकारने दिला जाणारा पुरस्कार हा खरा पुरस्कार आहे. त्यामुळे या खिरापतीसारख्या वाटल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही 'स्प्राऊट्स' या इंग्रजी दैनिकाकडून करण्यात येत आहे. 

दिनांक १५ मार्च रोजी दोन आयोजकांकडून या नावाने पुरस्कार वाटले जाणार आहेत. यावरून या पुरस्काराचे किती अवमूल्यन केले जाते, हे दिसून येते. हा पुरस्कार देण्यापूर्वी त्याची अगोदर सोशल माध्यमांवर जाहिरात केली जाते. यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधले दिग्गज नट, नट्या, मंत्री व समाजातील विविध सेलिब्रेटी प्रमुख पाहुणे म्हणून येणार, अशी घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात फटाकड्या व 'सी' ग्रेडचे टुकार कलाकार तेथे उपस्थित असतात. 

मागील वर्षी राखी सावंत या फटकड्या नटीच्या पतीला म्हणजेच आदिल दुराणी (Adil Khan Durrani) याला अटक करण्यात आली. गंभीर गुन्ह्याखाली हा दुराणी अटक होता. तुरुंगातून जामिनावर येताच त्याच्या हस्ते दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार कल्याण जाना या फ्रॉड इसमाने आयोजित केला होता. 

फाळके यांच्या पुरस्कार सोहळ्यातून कल्याण जाना हा दादासाहेब फाळके यांच्या नावाने वारंवार पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करतो, याच कार्यक्रमांतून जाना बोगस पीएचडी वाटण्याचेही काम करतो. यावर्षी त्याने The Washington University of Peace या बोगस संस्थेकडून पीएचडी देण्यासंबंधी जाहिरात केलेली आहे. वास्तविक अशा कोणत्याही प्रकारची युनिव्हर्सिटी नाही. या कथित विद्यापीठाची केवळ आकर्षक वेबसाईट आहे, प्रत्यक्षात हे विदयापीठ त्या जागेवर अस्तित्वातही नाही. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची (UGC ) मान्यता असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सपशेल बोगस विद्यापीठ आहे. 

कल्याण जाना हा फ्रॉड इसम आहे. हा दरवर्षी नवीन नावाने नकली विद्यापीठ दाखवतो व फेक मानद पीएचडीचे प्रमाणपत्र देतो. केवळ झेरॉक्सच्या दुकानातून डिजिटल प्रिंट काढून या कार्यक्रमांतून हे कथित 'पीएचडी'चे प्रमाणपत्र दिले जाते. या डिजिटल प्रिंटची किंमत फक्त १० रुपये आहे. त्यासाठी हा भामटा ५ हजारापासून ते १ लाख रुपयांपर्यंची रक्कम वसूल करतात. 

हे पुरस्कार व बोगस पीएचडी वाटण्यासाठी आयोजक शक्यतो मंत्री, पोलीस अधिकारी, ज्येष्ठ वकील, रिटायर्ड जज यांना आमंत्रित करतात. फेक प्रमाणपत्र वाटण्याच्या कार्यक्रमाला सरकारी व अधिकृत  स्वरूप आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो. कित्येक वेळेला हे आयोजक मिड-डे, ANI या प्रसारमाध्यमांतून चक्क खोट्या बातम्या देतात. ‘advertorial’ या नावाने या फेक बातम्यांनाही प्रसिद्धी मिळते, ही दुर्दैवाची बाब आहे.  

सन २००० मध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी एकत्र येवून Dadasaheb Phalke Academy या संस्थेची स्थापना केली. यामध्ये दिवंगत Santosh Singh Jain यांच्यासह Ram Gopal Gupta, Neena Jalan, Mithun Chakraborty, Chandrashekhar, Johny Lever, Sangram Shirke यांसारख्या मोठया कलाकारांचा समावेश होता. या संस्थेतर्फे खऱ्याखुऱ्या कलाकारांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून 'दादासाहेब फाळके ' यांच्या नावाने या पुरस्काराने सन्मानित केले जाई. या संस्थेतर्फे सन २०१९ पर्यंत पुरस्कार दिले गेले. मात्र कोरोनानंतर या संस्थेने हे पुरस्कार सोहळे बंद केले. 

या बंद पडलेल्या संस्थांचा गैरफायदा कल्याण जाना यांच्यासारख्या फ्रॉड लोकांनी घेतला. दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने त्यानी कलाकारांची दिशाभूल करणे सुरु केले व त्यातून गोरखधंदा सुरु केला, वास्तविक फ्रॉड जाना व त्याच्या टोळीतील फ्रॉड लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यायला हवी.

सहकार्य:उन्मेष गुजराथी
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
close