रमजान महिना प्रसिद्ध आहे तो यातील रोजा (उपवासा) मुळे. प्रत्येक धर्मात उपवासाला महत्व दिले गेले आहेत. उपवास धरण्याच्या पध्दती काहीशा वेगवेगळ्या असल्या तरी सर्व उपवासांचा सार एकच आहे तो म्हणजे आत्मशांती व शरीर शुद्धी.
प्रेषित हजरत पैगंबर यांनी रमजानचे रोजे कशा पध्दतीने धरावे हे स्पष्ट केले आहे.केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहणं म्हणजे रोजा नव्हे तर शरीराच्या प्रत्येक भागाशी निगडीत काही बंधने रोजामुळे आपण स्वतःवर लादून घेतो व अल्लाहची भिती मनात बाळगून स्वतःच्या स्वछंदी आचरणावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो.यातून वाईट सवयींना तिलांजली देऊन चांगल्या सवयी अंगी बाणाव्यात ही अपेक्षा असते.
पूर्वीच्या काळी लोकांचे शिक्षण कमी होते मात्र धार्मिकता खूप होती. हल्लीच्या काळात सुशिक्षितपण वाढले पण चुकीचे,वाईट,वाममार्ग अवलंब करणारी संख्या ही वाढली.कोणतेही वाईट कार्य नजरेसमोर आणल्यास ते करणारांमध्ये सुशिक्षित लोकच मोठया प्रमाणावर दिसून येतात. रोजा सर्व प्रकारच्या वाईट कार्यापासून रोखण्याचे कार्य करतो. डोळ्यांनी अश्लील काही पाहू नये,तोंडाने वाईट शब्द उच्चारु नये. निरपराध किंवा कमजोर लोकांवर अत्याचार करु नये,वाईट ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारचे कार्य रोजेदाराकडून अपेक्षित असते.ही सर्व बंधने पाळण्याचे कार्य रमजान महिन्यात केले जाते.
शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा उपवासाचे खूप महत्त्व आहे.महिन्याभराचे रोजे पूर्ण केल्यामुळे कॅन्सर सारख्या भयानक आजार सुद्धा बरा होतो हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे.त्याचबरोबर शारीरिक शुद्धीकरणाचे मोठे कार्य रोजामुळे घडून येते. सर्व धर्मांनी उपवासांचा पुरस्कार केलेला आहे त्यामुळे शास्त्रीय दृष्टी देखील उपवास करणे फायदेशीर आहे. मानवाकडून कोणत्याही प्रकारचा प्रमाद घडू नये यासाठी उपवासामध्ये अनेक बंधने लावलेली आहेत.ही सर्व बंधने पाळली गेल्यास सर्वार्थाने मनुष्य जीवन हे सतमार्गी होते.
(क्रमशः)
*सलीमखान पठाण सर
*श्रीरामपूर - 9226408082
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111