shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपुरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
जागतिक महिला दिनानिमित्त इंडीयन रेड क्रॉस सोसायटी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, आरोग्य विभाग पंचायत समिती श्रीरामपूर आदींच्या संयुक्त विद्यमाने सुरभी हॉस्पिटल अहमदनगर यांचे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत येथील नगरपरिषदेचे आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेनरोड श्रीरामपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुलभा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला डॉक्टरांची टीम आरोग्य तपासणी करणार आहेत. पुढील लक्षणे असणाऱ्या किंवा त्रास असणाऱ्या महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अंगावरून पांढरे किंवा लाल जाणे, गर्भ पिशवीमध्ये असणाऱ्या गाठी, गर्भ पिशवीच्या मुखांचे आजार, वारंवार होणारे गर्भपात, लग्नानंतर अनेक वर्ष गर्भधारणा न होणे, पहिल्या गर्भधारणेनंतर दुसऱ्या गर्भधारणेला अडचणी येणे, टेस्ट ट्यूब बेबी उपचार, स्तनांचे आजार, मासिक पाळीच्या समस्या तसेच महिलांच्या सर्व आजारांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. 


शिबिरामध्ये ईसीजी व ब्लड शुगर तपासणी मोफत केली जाईल. त्याचबरोबर टुडी इको व पॅपस्मिअर तपासणी सुरभी हॉस्पिटल अहमदनगर येथे केली जाणार आहे. तपासणीसाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. रुग्णांनी चालू असलेली औषधे व जुने रिपोर्ट सोबत आणावे. संयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच शिबिराचा लाभ घ्यावा. महिलांनी आपली नाव नोंदणी नक्षत्र कलेक्शन महात्मा गांधी पुतळ्यासमोर, मेन रोड श्रीरामपूर. सतीश सायकल सर्व्हिस, राधिका हॉटेल समोर, के के मोटर्स, बेलापूर रोड वेशी जवळ, श्रीरामपूर. यापैकी एका ठिकाणी करावे. सदरच्या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.
       शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ सचिव सुनील साळवे, गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी शोभाताई शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,भरत कुंकूलोळ, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके, सुखदेव शेरे, सुरेश वाघुले, श्रावण भोसले, केशव धायगुडे, गणेश थोरात, किरण बोरावके, अविनाश कुदळे, अभिजीत शिरसागर, किशोर गदीया, अरुण कतारे, गोरक्षनाथ बनकर, विनोदी हिंगानीकर, बदर शेख, सुरंजन साळवे, बन्सी फेरवानी, डॉ. स्वप्नील पुरणाळे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, डॉ. संजय दुशिंग, ज्ञानदेव माळी, किरण सोनवणे, नानासाहेब मुठे, कांतीलाल शिंदे, विपुल गागरे, सोपान नन्नवरे, राजेंद्र केदारी, मधुकर येडे, साहेबराव रक्ते, संदीप छाजेड, उमेश अग्रवाल, अवधूत कुलकर्णी, सचिन चंदन, प्रकाश मेटकर, विश्वास भोसले, महेंद्र भराड, प्रा. सुप्रिया साळवे, पुष्पाताई शिंदे, शोभा शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंखे, वर्षा दातीर, निर्मला लांडगे, माया चाबुकस्वार, स्वाती पुरे, डॉ. प्रतिभा विखे, गौरी भांड आदींसह सर्व संयोजन संस्था विशेष परिश्रम घेत आहे.


*पत्रकार राजु मिर्जा
(ब्युरो चीफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561274111
close