सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवकालीन गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी व पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी ..
इंदापूर: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे व वेगळेपण आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एक भाग आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या लढाईमध्ये या भागाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. २८ मार्च रोजी तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून बारामती हायटेक टेक्स्टाईल च्या अध्यक्ष सौ.सुनेत्रा अजित पवार यांनी या मतदार संघातील शिवकालीन गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर हेलिकॉप्टर मधून आणी प्रत्यक्ष पणे जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता ही छत्रपती शिवरायांचे आचार विचार डोळ्यासमोर ठेवूनच चालवली आहे अशी आमची धारणा व विश्वास आहे या विचारांना मजबूत करण्यासाठी या कार्याला पुढे नेण्यासाठी व आपल्या भारत देशाला बलशाली बनवण्यासाठी सुराज्य संकल्प या उपक्रमाचे आयोजन केले होते
सौ सुनेत्रा पवार यांनी इंदापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या असलेल्या गढीवर पुष्पहार अर्पण करून व चांदशाहवाली दर्ग्यास चादर अर्पण करून मोहिमेस सुरुवात केली. यानंतर पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर आणि किल्ल्याच्या पायथ्याशी सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे समाधी स्थळ या ठिकाणी देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली अशा भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक घालून पूजा केली. याच मंदिरात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेतली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरl शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली व महायुतीच्या घटक पक्षांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी व भारत देशाला तिसरी महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय सौ सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
त्यानंतर छत्रपती शिवरायांनी त्यांच्या वयाचा उमेदीचा काळ ज्या किल्ल्यावरती घालवला अशी स्वराज्याची पहिली राजधानी व महाराणी सईबाई भोसले यांचे समाधी स्थळ असलेला पुर्वीचा वेल्हे तालुका व आताच्या राजगड तालुक्यातील राजगड किल्ला त्याचप्रमाणे लहान वयामध्ये छत्रपती शिवरायांनी जो किल्ला जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले अशा तोरणा किल्ल्यावर , व नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची बाजी लावून हा किल्ला जिंकून स्वराज्याला अर्पण केला असे तानाजी मालुसरे यांचा प्राण गेल्यानंतर ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांनी" गड आला पण सिंह गेला "असा आक्रोश केला व छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असलेल्या या सिंहगड किल्ल्यावर ही पुष्पवृष्टी करण्यात आली.
हा कार्यक्रम झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जीवनपट उलघडून दाखवणारा आशिया खंडातील सर्वात भव्य व महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या आंबेगाव कात्रज पुणे येथील शिवसृष्टीला भेट देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यानंतर सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वारजे परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात सुमारे दोन हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला.अशा पद्धतीने आज दिवसभर हा कार्यक्रम करण्यात आला बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या या शिवकालीन गडकोट, किल्ले ,समाधी स्थळे, ही आपल्यासाठी ऐतिहासिक स्थळे नसून ही स्फूर्ती स्थळे आहेत असे आम्हाला वाटते युगपुरुष छत्रपती शिवरायांचा स्फूर्तीदायक इतिहास हा आजच्या तरुण पिढीला समजावा व पिढ्यान पिढ्या लोकांच्या स्मरणात राहावा. त्यातून राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा यामागचा उद्देश आहे. अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.