shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही - खा.सुप्रिया सुळे.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही - खा.सुप्रिया सुळे.
इंदापूर: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही. कोणी विरोधात बोलला तर त्यांना धमक्या देणे, फोन करणे  त्या कानावर येतात. हे अतिशय दुर्दैवी आहे . हे लोकशाही पद्धतीने नाहीतर दडपशाहीच्या पद्धतीने गोष्ट होत आहे. याचा मी जाहीर निषेध करते  असे आज इंदापूर येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे केले होते .यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच त्या म्हणाल्या की, हे दुर्दैव आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काय दृष्टच लागले आहे. तुमच्या आमच्या महाराष्ट्रात संस्कृत राजकारण असायचं. कारण गलिच्छ राजकारण आजच्या अदृश्य शक्ती आणि यंत्रणांकडून केले हे अतिशय दुर्दैवी आहे .कै. यशवंतराव चव्हाण यांचा हा महाराष्ट्र आहे. आम्ही निवडणूक आणि समाजसेवा ही लोकशाही पद्धतीनेच करत आलेलो आहे. आणि इथून पुढेही सूसंस्कृत पणे करत आहोत.
धमक्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, वर्तमानपत्राच्या बातम्यानुसार सांगण्यात आले की हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना देखील 
पत्र लिहिले आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. माझं असं  म्हणणं आहे की, ज्या व्यक्तीने उभ आयुष्य सामाजिक कामासाठी दिल आहे .तो राज्याचा महत्त्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याला धमकी देण्याची हिंमत कोण करीत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे . मी स्वतः दोन दिवसांपूर्वी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की, हर्षवर्धन पाटील यांना आपण तातडीने सुरक्षा द्यावी 
त्यांच्या बरोबरच कुठल्याही नागरिकाची ही हिंमतच कशी होते या लोकांची अशा धमक्या द्यायची. गृहमंत्र्यांनी यास जबाब दिला पाहिजे.गृहमंत्र्यांच्या माणसाला धमकी देतो आणि गृहमंत्र्यांची भीतीच या राज्यामध्ये राहिली नाही. कोयता गॅंग ,कोण  सत्तेत असलेला माणूस आमदार बंदूक घेऊन ,हे चाललय काय ? आपकी बार गोळीबार सरकार झाले आणि हर्षवर्धन भाऊ हे बारामती लोकसभा मतदारसंघातील सन्माननीय व्यक्ती आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही जर धमकी दिली तर ती आम्ही सहन करणार नाही .मग याच्यात पक्ष वगैरे काही नाही. नैतिकता आणि लोकशाही आहे हे गुंडाराज नाही .हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला अदृश्य शक्तीची दृष्ट लागली असून या शक्तीच्या आधी  महाराष्ट्रात असं चाललं होतं का? कुठलीतरी अदृश्य शक्ती आहे. जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू केला आहे .पक्ष फोडा, घर फोडा ,हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या प्रतिनिधीला धमक्या द्या .गोळीबार करा, सत्तेत असलेले लोक विधानभवनात एकमेकांची डोकी फोडतात. ही कुठली संस्कृती. ही आपल्या महाराष्ट्रात याची संस्कृती नाही. हे कुठून येत. देवालाच ठाऊक. पोलिसांचा मानसन्मान करणार आम्ही आहोत. मला अभिमान वाटतो की हे महाराष्ट्राचं पोलीस आहेत. पण सत्तेत असलेले आमदार यांना वाटतं की आपण काहीही करू शकतो. ही लोकशाही आहे. अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही आहोत.
तसेच आम्ही एकत्र असताना धमकी कोणी दिली का? कोणाला हे यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात आम्ही मोठे झालेल्या आहोत. आदरणीय पवार साहेब आज पर्यंत कोणालाही आवाज करून कोणाला बोलले नाहीत .साठ वर्षाचा अनुभव सर्वांना आहे .दुर्दैव आहे की काही लोक बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच ही धमकीची भाषा ऐकली. हे दुर्दैव आहे .याचा जाहीर निषेध करते कारण मतदार संघाचे नाव खराब होत असतं.
close