shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सावरगाव तळच्या शेतकरी महिला राज्यात अग्रेसर



सावरगाव तळ च्या महिलांना पाणी फाउंडेशन चा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार 


संगमनेर (प्रतिनिधी):- पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित स्पर्धेत सावरगाव तळ येथील साईकृपा महिला कृषी उत्पादक गटाला राज्यस्तरीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
 
    बालेवाडी पुणे येथे  पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी सिने अभिनेता अमिर खान, किरण राव, सह्याद्री फार्मचे प्रमुख विलास शिंदे, सत्यजित भटकळ, डॉ अविनाश पोळ,सिने अभिनेता प्रकाश राज तसेच कृषी,पशुसंवर्धन, सामाजिक,सेवा भावी संस्था,राज्यतील सर्व कृषी विद्यापीठ यांचे  कुलगुरू व संशोधक तसेच राज्य भरातील उद्योजक सिने क्षेत्रातील दिगग्ज अभिनेते विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातील 3000 हुन अधिक शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. त्या पैकी 39 गटांना तालुकास्तरीय पारीतोषिक देण्यात आले. तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या कृषी क्षेत्रातील पंढरी समजल्या जाणाऱ्या सावरगाव तळ येथील साईकृपा महिला कृषी उत्पादक गटाला राज्यस्तरीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या गटाला पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वय विक्रम फाटक,पोलीस पाटील गोरक्ष नेहे ,तालुका समनव्यक सविता पेटकर,मोहन गावंडे व नीता गाडे कृषी सहाय्यक गंगाराम ढोले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असल्याचे गटातील महिला सदस्य यांनी सांगितले. 
       कृषी गटाच्या अध्यक्ष माधुरी नेहे ,शैला फापाळे, सुवर्णा नेहे, अंकिता थिटमे, शैला थिटमे, विद्या थिटमे, अर्चना थिटमे, मीना थिटमे,अक्षदा थिटमे, मनीषा शिरतार ,गीतांजली शिरतार,इंदूबाई थिटमे गटातील या सर्व महिलांची प्रचंड मेहनत व शेतीतील उत्कृष्ट नियोजना मुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. महिलांचे गावात आगमन होताच सर्व गावकरी यांनी त्यांचे  जंगी स्वागत केले.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ.अविनाश पोळ,सत्यजित भटकळ, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, डॉ.शंकर गाडे, प्रा.संतोष फापाळे ,सरपंच अनिता नेहे ऑस्ट्रेलिया येथील उद्योजक काशिनाथ थिटमे यांनी या गटाचे अभिनंदन केले.
close